सांगली : वऱ्हाडाचा टेम्पो नाल्यात कोसळला, सुरुलजवळ अपघात : पंधराजण जखमी; पाचजण गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 13:31 IST2018-06-18T13:31:36+5:302018-06-18T13:31:36+5:30
सुरुल (ता. वाळवा) येथे वऱ्हाडाचा टेम्पो वळण घेण्याच्या मार्गावर नाल्यात उलटल्याने पंधराजण जखमी झाले आहेत. यातील पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी सकाळी हा अपघात झाला.

सांगली : वऱ्हाडाचा टेम्पो नाल्यात कोसळला, सुरुलजवळ अपघात : पंधराजण जखमी; पाचजण गंभीर
सांगली : सुरुल (ता. वाळवा) येथे वऱ्हाडाचा टेम्पो वळण घेण्याच्या मार्गावर नाल्यात उलटल्याने पंधराजण जखमी झाले आहेत. यातील पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी सकाळी हा अपघात झाला.
धामवडे (ता. शिरोळ) येथून वऱ्हाडी टेम्पो (क्र. एमएच १० झेड ५६१७) आष्टा (ता. वाळवा) येथे निघाला होता. दुपारी साडेबारा वाजता लग्नाचा मुहूर्त होता.
करमाळामार्गे सुरुलगावच्या हद्दीत गेल्यानंतर वळण घेण्याच्या मार्गावर चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे टेम्पो नाल्यात जाऊन कोसळला.
अपघाताचे वृत्त समजताच परिसरातील लोकांनी धाव घेतली. टेम्पोतील जखमींना बाहेर काढून इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघातग्रस्त टेम्पो क्रेनच्यामदतीने बाहेर काढण्यात आला. अपघाताचे वृत्त समजताच जखमींच्या नातेवाईकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली.