विजेचा धक्का बसल्याने एक मोर, दोन लांडोर ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 13:06 IST2017-10-23T12:59:34+5:302017-10-23T13:06:53+5:30

जत तालुक्यातील घाटगेवाडी येथे पवनऊर्जा निर्माण कंपनीच्या विद्युत जन्नित्रातील विजेचा धक्का बसून एक मोर व दोन लांडोरींचा मृत्यू झाला. ही घटना चार-पाच दिवसांपूर्वी घडली आहे. घटना घडलेले ठिकाण निर्जन आहे. त्यामुळे याची माहिती उशिरा मिळाली. याबाबत वन परिमंडल अधिकारी शंकर गुगवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी अद्याप जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

A peacock killed two people, after the lightning hit them | विजेचा धक्का बसल्याने एक मोर, दोन लांडोर ठार

विजेचा धक्का बसल्याने एक मोर, दोन लांडोर ठार

ठळक मुद्देघाटगेवाडीत घटना, चौकशी सुरूजत पोलिसात अद्याप गुन्हा दाखल नाही. माहिती मिळाल्यानंतर पुढील कारवाई

जत ,दि. २३ : तालुक्यातील घाटगेवाडी येथे पवनऊर्जा निर्माण कंपनीच्या विद्युत जन्नित्रातील विजेचा धक्का बसून एक मोर व दोन लांडोरींचा मृत्यू झाला. ही घटना चार-पाच दिवसांपूर्वी घडली आहे. घटना घडलेले ठिकाण निर्जन आहे. त्यामुळे याची माहिती उशिरा मिळाली. याबाबत वन परिमंडल अधिकारी शंकर गुगवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी अद्याप जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.


घाटगेवाडी, रामपूर, मल्लाळ परिसरात लांडोर व मोर यांचा वावर असतो. घाटगेवाडी परिसरात असणाऱ्या  पवनऊर्जा निर्माण कंपनीच्या विद्युत जन्नित्राला संरक्षण तारेची जाळी नाही. मोर व लांडोर तेथे चरण्यासाठी गेले असावेत, त्यानंतर विजेचा धक्का बसून त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वन अधिकाऱ्यानी व्यक्त केला.


पंचनामा करून मोरांचे अवशेष ताब्यात घेण्यात आले. ही घटना पवनऊर्जा निर्माण कंपनीच्या परिसरात घडली आहे. त्यामुळे त्यांना बोलावून घेऊन यासंदर्भात खुलासा घेतला जाणार आहे. त्यानंतर जत पोलिसात गुन्हा दाखल केला जाणार आहे.


शिकारीबाबत तपास

शिकाऱ्याकडून मोरांची शिकार करत असताना घटना घडली आहे का? याचीही माहिती तेथील स्थानिकांकडून घेण्यात येत आहे. संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे वन अधिकारी शंकर गुगवाड यांनी सांगितले.

Web Title: A peacock killed two people, after the lightning hit them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.