सांगलीत १३ रोजी पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सव, जागतिक किर्तीच्या दिग्गज कलाकारांचा आविष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 14:26 IST2018-01-09T14:16:25+5:302018-01-09T14:26:18+5:30

स्वरवसंत ट्रस्टतर्फे चौथा स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सव येत्या १३ जानेवारीस सांगलीत आयोजित केला आहे. जागतिक किर्तीच्या अनेक दिग्गज कलाकारांच्या आविष्काराने महोत्सव रंगणार आहे, अशी माहिती संयोजक बाळासाहेब कुलकर्णी व मिलिंद कुलकर्णी यांनी दिली. ​​​​​​​

Pandit Bhimsen Joshi Music Festival on the 13th, Sangalyat, invented the world famous giant | सांगलीत १३ रोजी पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सव, जागतिक किर्तीच्या दिग्गज कलाकारांचा आविष्कार

सांगलीत १३ रोजी पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सव, जागतिक किर्तीच्या दिग्गज कलाकारांचा आविष्कार

ठळक मुद्दे कै. पं. वसंतराव गुरव संवादिनी वादक पुरस्कार पं. रवींद्र काटोटी यांना ८९ वषींय माऊली टाकळकर यांचाही विशेष सत्कार करण्यात येणार सांगलीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात १३ जानेवारीस महोत्सव

सांगली : स्वरवसंत ट्रस्टतर्फे चौथा स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सव येत्या १३ जानेवारीस सांगलीत आयोजित केला आहे. जागतिक किर्तीच्या अनेक दिग्गज कलाकारांच्या आविष्काराने महोत्सव रंगणार आहे, अशी माहिती संयोजक बाळासाहेब कुलकर्णी व मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.

सांगलीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात १३ जानेवारीस सकाळी साडे आठ वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत दोन सत्रात हा महोत्सव होईल. सकाळच्या पहिल्या सत्रात साडे आठ वाजता सांगलीतील रफीक नदाफ, शफात नदाफ यांचे सतारवादन, पुण्याचे संदीप रानडे यांचे शास्त्रीय गायन आणि बंगळुरूचे डॉ. रविंद्र काटोटी यांचे एकल हार्मोनियम वादन होणार आहे.

दुसऱ्या सत्रात मुंबईच्या मानसकुमार यांचे व्हायोलियन वादन, बंगळुरूचे पं. प्रवीण गोडखिंडी यांचे बासरीवादन आणि त्यानंतर रात्री पं. संजीव अभ्यंकर आणि विदुषी डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या जसरंगी जुगलबंदीने महोत्सवाची सांगता केली जाणार आहे.


या कार्यक्रमात कै. पं. वसंतराव गुरव संवादिनी वादक पुरस्कार पं. रवींद्र काटोटी यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच पंडित भीमसेन जोशी यांच्यासोबत ५0 वर्षाहून अधिक काळ टाळवादक म्हणून साथसंगत केलेले ८९ वषींय माऊली टाकळकर यांचा विशेष सत्कारही यावेळी करण्यात येणार आहे.

महोत्सवात हार्मोनियमवर सुयोग कुंडलकर,मिलिंद कुलकर्णी, तर तबलासाथ अजिंक्य जोशी, महेश देसाई, यशवंत वैष्णव व रोहित मुजुमदार देणार आहेत. कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिका संयोजकांनी ठिकठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत.
 

Web Title: Pandit Bhimsen Joshi Music Festival on the 13th, Sangalyat, invented the world famous giant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.