कडेपूरजवळ कार जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 21:03 IST2017-10-07T21:03:38+5:302017-10-07T21:03:47+5:30

 Car burns near Kithapur near Khak | कडेपूरजवळ कार जळून खाक

कडेपूरजवळ कार जळून खाक

लोकमत न्यूज नेटवर्क
कडेगाव : कडेपूर (ता. कडेगाव)जवळ कारने अचानक पेट घेऊन ती पूर्ण जळून खाक
झाली. यात सुमारे ६ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये
कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे कडेगाव पोलिसांनी सांगितले. गोरेगाव
(मुंबई) येथील बालाजी सुरेशबाबू तेवेन्द्रिया यांनी याबाबत कडेगाव
पोलिसात वर्दी दिली आहे.

शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास बालाजी तेवेन्द्रिया हे नांदोशी (ता.
खटाव) हून कडेपूर मार्गे वडियेरायबाग (ता. कडेगाव) कडे कार (क्र. एमएच ४७
एन ६०१०) ने आपल्या ४ मित्रांसमवेत चालले होते. ३ वाजून १० मिनिटांनी ते
कडेपूरजवळ कालव्यालगत आल्यावर बॉनेटच्या खालून धूर येऊ लागला. इंजिनने
अचानक पेट घेतला होता. तात्काळ सर्वजण गाडीतून बाहेर पडल्यावर काही
वेळातच कार पूर्ण जळून खाक झाली.

यावेळी प्रसंगावधान राखल्याने गाडीतील
सर्वजण बचावले. याबाबत कडेगाव पोलिसांत नोंद केली असून पोलिस अधिक तपास
करीत आहेत.

Web Title:  Car burns near Kithapur near Khak