...म्हणून वय २८ लग्नासाठी आहे परफेक्ट !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2017 10:06 AM2017-09-24T10:06:49+5:302017-09-24T15:40:03+5:30

लग्न करण्यासाठी २८ वर्षाचे वय सर्वात परफेक्ट मानले जाते. चला जाणून घेऊया की हे वय का परफेक्ट आहे.

... So age 28 is perfect for marriage! | ...म्हणून वय २८ लग्नासाठी आहे परफेक्ट !

...म्हणून वय २८ लग्नासाठी आहे परफेक्ट !

googlenewsNext
ही दिवसांपूर्वी एका टीव्ही मालिकेत एका नऊ वर्षाच्या मुलाचे एका अठरा वर्षाच्या मुलीचे लग्न दाखविण्यात आले होते. या मालिकेत वयाच्या संदर्भ आल्याने प्रेक्षकांनी या मालिकेवर आक्षेप घेत सदर मालिकेचे प्रदर्शन थांबविण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर याविषयावर खूप वाद-विवादही झालेत. मात्र प्रेक्षकांच्या मागणीनुसार ही मालिका शेवटी बंद पाडण्यात आली. 

लग्न आपल्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा निर्णय असतो. यासाठी बहुतांश लोक लग्नाचा निर्णय विचारपुर्वकच घेतात. मात्र बऱ्याच मुला-मुलींच्या मनात लग्नाच्या योग्य वयाबाबत काही प्रश्न असतात. जर आपल्याही मनात असा प्रश्न असेल तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, लग्न करण्यासाठी २८ वर्षाचे वय सर्वात परफेक्ट मानले जाते. चला जाणून घेऊया की हे वय का परफेक्ट आहे. 

* सध्या मुलगा आणि मुलगी यांच्यासाठी करिअर आणि लग्न या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. या वयात दोघेही आपले करिअर आणि मानसिकरुपात लग्नासाठी परिपक्व होतात.  

* या वयात मुलगा आणि मुलगा दोन्हीही परिवाराला सांभाळण्यासाठी पूर्णत: तयार झालेले असतात.  

* या वयात मुलगा आणि मुलगी दोघांना आवड-नावडची जाणिव झालेली असते. ज्यामुळे त्यांना योग्य पार्टनरची निवड करताना अडचणी येत नाहीत. 
   
* लग्नानंतर मुलींच्या शरीरात खूप शारीरिक बदल होत असतात. त्या बदलांसाठी मुलगी शारीरिक सक्षम असणे आवश्यक असते. या वयात मुलगी शरीरातील त्या बदलांसाठी पूर्णत: तयार असते.  

* या वयात मुलगी आई बनण्यासाठी शारीरिक आणि मानसिक तयार होते. याव्यतिरिक्त या वयात या जबाबदारीला स्वीकारण्यासाठी पूर्णत: सक्षम झालेली असते.  
* या वयात दोघेही समजदार बनत असल्याने लहान-सहान गोष्टींंवर भांडण न करता समजदारी त्या समस्या सोडवू शकतात. म्हणून हे वय लग्नासाठी परफेक्ट मानले जाते.      

Web Title: ... So age 28 is perfect for marriage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.