तुम्ही पुन्हा पुन्हा प्रेमात पडता का? नेमकं का होतं असं?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2018 01:53 PM2018-06-07T13:53:44+5:302018-06-07T13:53:44+5:30

काही लोकांना या गोष्टींवरुनच ते प्रेमात पडले असं वाटतं. त्यांना जीवनसाथी मिळाल्याचा अनुभव यायला लागतो. पण हे प्रेम आहे की, आणखी काही हे जाणून घेतल्यावरच पुढे जाण्यात समजदारी आहे. 

Relationship Tips : Signs its just an attraction and not love | तुम्ही पुन्हा पुन्हा प्रेमात पडता का? नेमकं का होतं असं?

तुम्ही पुन्हा पुन्हा प्रेमात पडता का? नेमकं का होतं असं?

Next

लाईफमध्ये एखाद्या नव्या व्यक्तीचं येणं, त्याच्याशी बोलणं, दिवसरात्र त्या व्यक्तीच्या संपर्कात राहणं आणि हळुहळु भावनात्मक रुपाने त्या व्यक्तीच्या जवळ येणं याला अनेकदा काही लोक प्रेम समजून बसतात. काही लोकांना या गोष्टींवरुनच ते प्रेमात पडले असं वाटतं. त्यांना जीवनसाथी मिळाल्याचा अनुभव यायला लागतो. पण हे प्रेम आहे की, आणखी काही हे जाणून घेतल्यावरच पुढे जाण्यात समजदारी आहे. 

1) आधी स्वत: विचार करा

5 things girls find attractive in guys | लड़कों की इन 5 क्वालिटीज पर फिदा हो जाती हैं लड़कियां

त्या व्यक्तीला बघताच तुम्ही हरवून जाता. नंतर जवळच्या मित्रांसोबत तिच्याविषयी बोलता, त्यांचा सल्ला घेता. पुढे सर्वांनीच तुम्हाला हिरवा झेंडा दाखवला. पण तुम्ही कधी स्वत:ला विचारलं का? काय ती व्यक्ती खरंच तुमच्यासाठी आहे का? काय हे नातं पुढे सुरु ठेवायला हवं? काय तुम्हा दोघांचं पटणार आहे? हे प्रश्न एकदा तुम्ही स्वत:ला विचारायला हवे. त्याशिवाय पुढे जाणे मुर्खपणाचे ठरेल.

2) घाई करु नका

तुम्हाला आवडणारी व्यक्ती तुमच्याशी बोलत असेल, भेटायला येत असेल, तुमच्या सर्व गोष्टींमध्ये रुची दाखवत असेल तर याला प्रेम समजण्याआधी थोडा वेळ घ्या. पूर्ण दिवस बोलणं यात काही चुकीचं नाहीये. पण मधे थोडा स्पेसही ठेवा. केवळ त्यांच्याशीच बोलण्यापेक्षा मित्रांना, परिवाराला वेळ दया. यादरम्यान तुम्ही निर्णयावर येऊन पोहोचाल. 

3) चांगलं-वाईट यात फरक करणं शिका

मेसेजवर बोलल्यानंतर आणि काहीवेळा भेटल्यानंतर एकमेकांच्या स्वभावातील फरक समजून घ्या. त्या व्यक्तीची कोणती गोष्ट पसंत नाही आणि त्या व्यक्तीची कोणची गोष्ट तुम्ही स्विकार करु शकणार किंवा नाही. हे जाणून घेतल्यावरच पुढे जावे. 

4) प्रेमामागचं कारण जाणून घ्या

ती व्यक्ती तुम्हाला का आवडते याचं काहीना काही कारण असेलच. तुम्हाला त्या व्यक्तीचा लूक, त्याचं बोलणं आवडतं किंवा तुम्ही एकटे होते म्हणून तुम्ही प्रेमात पडले ? प्रेमात पडण्याचं योग्य कारण शोधा आणि थोडा वेळ द्या. प्रेम असं असावं जे तुमच्या जीवनातील प्रत्येक चांगल्या वळणावर तुमच्या सोबत असावं. कोणत्याही परिस्थितीत प्रेम मजबूत रहावं. 

5) मित्रांशी बोला

Making more friends boosts your brain as per your age | ज्यादा दोस्त बनाने वालों का दिमाग होता है दुरुस्त, जानिए कुल 5 फायदे

काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला उघड्या डोळ्यांनीही दिसत नाहीत. आपलं डोकं ते समजून घेण्याच्या स्थितीत नसतं. अशावेळी आपल्या जवळच्या मित्रांची मदत घ्या. त्यांच्याशी बोला, त्यांचा सल्ला घ्या आणि त्यानंतरच निर्णय घ्या.

Web Title: Relationship Tips : Signs its just an attraction and not love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.