११ डिसेंबरला सर्वात जास्त कपल्स करतात ब्रेकअप्स, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2018 12:15 PM2018-11-09T12:15:30+5:302018-11-09T12:15:58+5:30

गर्लफ्रेन्ड आणि बॉयफ्रेन्डचं नातं तुटण्याची वेगवेगळी कारणे असतात. ब्रेकअप व्हायचं असेल किंवा कुणाला सोडून जायचं असेल तर कुणी काही मुहूर्त काढत बसत नाही.

A large number of break up on 11 december, know why | ११ डिसेंबरला सर्वात जास्त कपल्स करतात ब्रेकअप्स, पण का?

११ डिसेंबरला सर्वात जास्त कपल्स करतात ब्रेकअप्स, पण का?

(Image Credit : lifealth.com)

गर्लफ्रेन्ड आणि बॉयफ्रेन्डचं नातं तुटण्याची वेगवेगळी कारणे असतात. ब्रेकअप व्हायचं असेल किंवा कुणाला सोडून जायचं असेल तर कुणी काही मुहूर्त काढत बसत नाही. जेव्हा हवं तेव्हा कपल्स ब्रेकअप करतात. पण कपल्स डिसेंबर महिन्यात आणि तेही ११ डिसेंबरला जास्त ब्रेकअप करतात, अशी एक माहिती समोर आली आहे. इतकेच नाहीत ११ डिसेंबर हा ब्रेकअप डे म्हणून पाळला जातो, असेही म्हटले जाते. 

डिसेंबरमध्ये ख्रिसमस किंवा ३१ डिसेंबरआधी जास्त ब्रेकअप्स होण्याची वेगवेगळी कारणे काही मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितली. ते सांगतात की, लोकांना नव्या वर्षापासून नव्या आयुष्याची सुरुवात करायची असते. त्यामुळे ते  न्य इअऱ आधी जुनी नाती मागे सोडतात. काही लोकांना आपल्या पार्टनरचं न्य इअर खराब करायचं नसतं त्यामुळे ते त्याआधीच वेगळे होण्याची निर्णय घेतात. जर कुणी फार अत्याचार होत असलेल्या नात्यात असेल तर त्यांचीही वर्षाच्या शेवटच्या महिन्यात ब्रेकअप करण्याची शक्यता अधिक असते. कारण त्यांना नव्या वर्षातही जुन्या वेदनासोबत जगायचं नसतं. 

तज्ज्ञ सांगतात की, एक चांगलं आहे की डिसेंबरमध्ये ब्रेकअप केल्यानंतक लोक लगेच नव्या आयुष्याला स्विकारतात. इंटरनेट सर्फिंग आणि डेटिंग वेबसाइट्सची आकडेवारी पाहिली तर जानेवारीमध्ये यांचं ट्रॅफिक वाढलेलं असतं. जुन्या नात्याला मागे सोडल्यानंतर लोक दुसऱ्यांशी जवळ येण्याच्या प्रयत्नात असतात आणि त्यांना स्वत:ला एक संधी द्यायची असते. 

तज्ज्ञानुसार , जर तुम्ही कुणाला फार वेळेपासून डेट करत नसाल किंवा करत असाल पण त्या व्यक्तीबाबत श्योअर नाहीत. तेव्हा गिफ्टच्या देवाण-घेवाणीचा ताण वाढतो. काही ब्रेकअप हे गिफ्टच्या देण्या-घेण्यावरु, मनासारखं गिफ्ट न मिळाल्यानेही होतात. 

Web Title: A large number of break up on 11 december, know why

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.