व्हॉलीबॉल स्पर्धेत सावर्डे विद्यालयाचा संघ विभागीय स्तरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 17:13 IST2017-10-02T17:13:30+5:302017-10-02T17:13:35+5:30

सावर्डे (चिपळूण), दि. २ : सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे विद्यालयाने रत्नागिरी जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत १७ वर्षे मुलांच्या वयोगटात फायनल जिंकत अजिंक्यपद पटकावले. हा संघ आता सातारा जिल्हा क्रीडा संकूल येथे ५ ते ७ आॅक्टोबर दरम्यान होणाºया कोल्हापूर विभागस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहे.

In the volleyball competition, the team of all the sarude school teams at the departmental level | व्हॉलीबॉल स्पर्धेत सावर्डे विद्यालयाचा संघ विभागीय स्तरावर

व्हॉलीबॉल स्पर्धेत सावर्डे विद्यालयाचा संघ विभागीय स्तरावर

सावर्डे (चिपळूण) , दि. २ : सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे विद्यालयाने रत्नागिरी जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत १७ वर्षे मुलांच्या वयोगटात फायनल जिंकत अजिंक्यपद पटकावले. हा संघ आता सातारा जिल्हा क्रीडा संकूल येथे ५ ते ७ आॅक्टोबर दरम्यान होणाºया कोल्हापूर विभागस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहे.

रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालय व चिपळूण तालुका शारिरीक शिक्षण शिक्षक संघ यांच्यातर्फे सह्याद्री क्रीडा संकूल सावर्डे या ठिकाणी रत्नागिरी जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा झाल्या.

सावर्डे विद्यालयाच्या १७ वर्षाखालील मुलांच्या संघाने अंतिम सामन्यात रत्नागिरीच्या संघावर मात करत अजिंक्यपदावर आपले नाव कोरले.

या विजयी संघात सौरभ राणिम, अक्षय परब, सौरभ जगताप, राज गावणंग, साहिल डाऊल, सुमित चांदे, शुभम बागवे, राज चव्हाण, मंगेश म्हस्के, साहिल भंडारी, धीरज जाधव, साहिल चव्हाण, राहूल कातकर, आदित्य बागवे या खेळाडूंचा समावेश होता. प्रशिक्षक सुहास आडनाईक यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.

Web Title: In the volleyball competition, the team of all the sarude school teams at the departmental level