हर्णेतील मच्छिमार बोटींवर गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 05:43 IST2018-05-18T05:43:57+5:302018-05-18T05:43:57+5:30

बोटीचा पाठलाग केला जात असल्याचा राग धरुन श्रीवर्धनच्या बोटीकडून हर्णे येथील मच्छिमार बोटींवर गोळीबार केल्याची घटना बुधवारी घडली.

Fishermen firing in Herne | हर्णेतील मच्छिमार बोटींवर गोळीबार

हर्णेतील मच्छिमार बोटींवर गोळीबार

दापोली (जि. रत्नागिरी) : बोटीचा पाठलाग केला जात असल्याचा राग धरुन श्रीवर्धनच्या बोटीकडून हर्णे येथील मच्छिमार बोटींवर गोळीबार केल्याची घटना बुधवारी घडली.
हर्णेबंदरातील काही मच्छिमार बोटी श्रीवर्धन (जि. रायगड) समुद्रात मासेमारी करताना एलईडी लाईटद्वारे मासेमारी करणारी बोट आढळल्याने हर्णेतील मच्छिमारांनी त्या बोटीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. श्रीवर्धनच्या बोटीकडून गोळीबार करण्यात आला. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी चार बोटींचे नुकसान झाले़. भ्याड हल्ला करणाऱ्या मच्छिमारांच्याविरोधात दापोली तालुका संघर्ष समिती तक्रार दाखल करणार आहे़

Web Title: Fishermen firing in Herne