आजचे राशीभविष्य - 31 मे 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 07:12 AM2019-05-31T07:12:26+5:302019-05-31T07:12:40+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's zodiac sign - 31 May 2019 | आजचे राशीभविष्य - 31 मे 2019

आजचे राशीभविष्य - 31 मे 2019

Next

मेष - श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आजचा दिवस आपल्याला पूर्ण अनुकूल आहे. सगळ्या कामात यश मिळाल्याने आपण खूप आनंदी व प्रसन्न असाल. आणखी वाचा

वृषभ - आज सावधगिरीने राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आपले मन अनेक प्रकारच्या चिंतांनी व्यग्र असेल. स्वास्थ्यही जरा नरमच राहील. विशेषतः डोळ्यांचा त्रास संभवतो. आणखी वाचा

मिथुन - आपला आजचा दिवस विविध लाभ प्राप्त करून देणारा ठरेल असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबात पत्नी आणि मुलांकडून फायदयाच्या बातम्या कळतील. आणखी वाचा

कर्क - नोकरी व्यवसाय करण्यार्‍यांना आजचा दिवस खूप लाभदायक आहे असे श्रीगणेश म्हणतात. नोकरीत पदाधिकारी तुमच्यावर खूश असतील त्यामुळे पदोन्नती होऊ शकते. आणखी वाचा

सिंह - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस मध्यम फल देणारा जाईल. धार्मिक आणि मंगलकार्यात हजेरी लावाल. न्यायी व्यवहार कराल. धार्मिक प्रवास ठरवाल. आणखी वाचा

कन्या - आज नवीन कामे सुरू न करण्याचे श्रीगणेश सांगतात. बाहेरचे खाद्य पदार्थ खाऊन स्वास्थ्य बिघडू शकते. मन रागीट बनेल. म्हणून बोलण्यावर ताबा ठेवा. आणखी वाचा

तूळ - आजचा संपूर्ण दिवस साफल्याचा व आनंदाचा असेल ज्यामुळे पूर्ण दिवस आनंदच अनुभवाल. सार्वजनिक जीवनासंबंधीच्या कार्यात सफलता मिळवाल. आणखी वाचा

वृश्चिक - सर्व दृष्टींनी आजचा दिवस सुखात जाईल असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबीयांसमवेत वेळ आनंदात घालवाल.शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक प्रसन्नता अनुभवाल. आणखी वाचा

धनु - श्रीगणेश आजचा मिश्रफलदायी दिवस असल्याचे सांगतात. पोटाच्या समस्या त्रास देतील. संततीचे स्वास्थ्य आणि अभ्यास यामुळे चिंतित राहाल. आणखी वाचा

मकर - श्रीगणेश सांगतात की आजचा आपला दिवस प्रतिकूलतेने भरलेला आहे, त्यामुळे मन खिन्न राहील. शारीरिक स्फूर्ती, तरतरी यांचा अभाव राहील. आणखी वाचा

कुंभ - आज आपण तना-मनाने प्रसन्न असाल. मनात असलेले चिंतेचे मळभ दूर होऊन उत्साह वाढेल. भाऊबंदा बरोबर एकत्र येऊन नवीन योजना ठरवाल. आणखी वाचा

मीन - श्रीगणेश आज तुम्हाला बोलण्यावर संयम ठेवायला सांगतात. रागामुळे कोणाशी तक्रार किंवा मतभेद होण्याची शक्यता आहे. शारीरिक कष्ट वाढतील. आणखी वाचा
 

Web Title: Today's zodiac sign - 31 May 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.