अटल सेतूवरून डॉक्टर महिलेने मारली उडी, सेतूवरील पहिलीच घटना, शोधकार्य सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 09:26 AM2024-03-21T09:26:26+5:302024-03-21T09:26:56+5:30

या महिलेचा न्हावा-शेवा पोलिस समुद्रात शोध घेत आहेत. अटल सेतूवरील आत्महत्येचा प्रयत्न केल्याची ही पहिलीच घटना आहे.

Woman doctor jumps from Atal Setu, first incident on the bridge, investigation underway | अटल सेतूवरून डॉक्टर महिलेने मारली उडी, सेतूवरील पहिलीच घटना, शोधकार्य सुरू

अटल सेतूवरून डॉक्टर महिलेने मारली उडी, सेतूवरील पहिलीच घटना, शोधकार्य सुरू

उरण : नैराश्येतून मुंबईतील ४३ वर्षीय डॉक्टर महिलेने अटल सेतूवरून सोमवारी उडी मारली. या महिलेचा न्हावा-शेवा पोलिस समुद्रात शोध घेत आहेत. अटल सेतूवरील आत्महत्येचा प्रयत्न केल्याची ही पहिलीच घटना आहे.

भोईवाडा परिसरात डॉक्टर किंजल शहा (४३) राहते. बऱ्याच दिवसांपासून ती तणावाखाली होती. सोमवारी घरातून निघताना किंजलने ‘आपण अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या करत आहे’ अशी चिठ्ठी लिहिली. पावणेदोन वाजण्याच्या सुमारास ती दादर येथून खासगी टॅक्सीने अटल सेतूवर आली. सेतूवरील बॅरिकेड्सचे काम सुरू असलेल्या ठिकाणी तिने समुद्रात उडी घेतली. 

भोईवाड्यात मीसिंगची नोंद
किंजल बेपत्ता झाल्या प्रकरणी   मुंबईतील भोईवाडा पोलिस ठाण्यात मीसिंगची नाेंद केली आहे. भोईवाडा पोलिस ठाण्याचे पाेनि सुभाष बोराटे यांनी न्हावा-शेवा बंदर पोलिस ठाण्याचे वपाेनि राजेंद्र कोते यांना माहिती दिल्यानंतर संयुक्तरीत्या शोध सुरू केला आहे. सागरी सुरक्षा दल, पोलिसांच्या गस्ती नौकांच्या मदतीने  सागरी क्षेत्र, किनारपट्टी भागात किंजलचा शोध सुरू असल्याचे  न्हावा-शेवा बंदर पोलिस ठाण्याचे वपाेनि राजेंद्र कोते यांनी दिली.

Web Title: Woman doctor jumps from Atal Setu, first incident on the bridge, investigation underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड