पनवेलच्या पाणी पुरवठा योजनांना गती द्या : बबनराव लोणीकर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 08:22 PM2018-08-28T20:22:02+5:302018-08-28T20:22:43+5:30

पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील पाणी पुरवठा सुरळीत करण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीनुसार मंत्रालयात आज बैठक आयोजित करण्यात आली होती.

Speed ​​up the Panvel water supply schemes: Babanrao Lonikar | पनवेलच्या पाणी पुरवठा योजनांना गती द्या : बबनराव लोणीकर

पनवेलच्या पाणी पुरवठा योजनांना गती द्या : बबनराव लोणीकर

googlenewsNext

पनवेल: पनवेल महानगर पालिकेच्या हद्दीतील नागरिकांना वेळेत व पुरेसा पाणी पुरवठा होण्यासाठी पाणी पुरवठा योजनांच्या कामाला गती देण्याचे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्ठता विभागाचे मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज येथे दिले.

पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील पाणी पुरवठा सुरळीत करण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीनुसार मंत्रालयात आज बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी लोणीकर बोलत होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकुर, पनवेल महानगर पालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, पनवेल म.न.पा.चे सभागृह नेता परेश ठाकुर, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, पनवेल महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ, पनवेल महानगर पालिकेचे व पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी  उपस्थित होते.


लोणीकर म्हणाले, पनवेल महानगर पालिकेच्या हद्दीतील पाणी पुरवठा योजना सुरळीत ठेवण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत प्रयत्न करण्यात येत आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईन जुन्या झाल्या असल्याने पाणी गळतीचे प्रमाण वाढले आहे. गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी एक महिन्यांच्या आत प्रयत्न केले जातील. पाणी पुरवठा योजनांना होणारा खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जातील. महानगर पालिकेच्या हद्दीत वेळीच व पुरेसा पाणी पुरवठा करण्यासाठी न्हावा –शेवा पाणी पुरवठा योजना टप्पा क्रमांक -3 तयार करण्यात आली असून योजनेची मंजुरी अंतिम टप्प्यात आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत अमृत योजनेतून सादर करण्यात आलेल्या पनवेल महानगर पालिका क्षेत्रातील 29 गावाच्या शहरी निकषाप्रमाणे दरडोई 135 लिटर प्रति माणसी या प्रमाणे सेवास्तर उंचविण्यासाठी पाणी पुरवठा योजनेची अंदाजपत्रके व आराखडे तयार करण्यात आले आहेत. ते नगर विकास विभागाला पाठविण्याच्या सूचनाही यावेळी लोणीकर यांनी दिल्या.

Web Title: Speed ​​up the Panvel water supply schemes: Babanrao Lonikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.