धान्य वितरणात रायगड चौथे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 04:54 AM2018-11-15T04:54:19+5:302018-11-15T04:55:01+5:30

एन्ड टू एन्ड कॉम्प्युटरायझेशनचा राज्यभर परिणाम : चार महिन्यांत जिल्ह्यात विक्रमी बचत

Raigad fourth in the grain distribution | धान्य वितरणात रायगड चौथे

धान्य वितरणात रायगड चौथे

Next

जयंत धुळप

अलिबाग : राज्यात ‘एन्ड टू एन्ड कॉम्प्युटरायझेशन’ या प्रकल्पांतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण करण्याचा प्रकल्प राबविण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत सर्व रास्त भाव धान्य दुकानांत ई-पॉस मशिन बसविण्यात आल्या असून त्याद्वारे पात्र लाभार्थ्यांची बायोमेट्रिक ओळख पटवून शिधा वस्तूंचे वितरण करण्यात येत आहे. यामुळे वितरण व्यवस्थेत आमूलाग्र बदल झाला असून वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक होत आहे.

रायगड जिल्ह्यात या बदलामुळे गेल्या चार महिन्यांत ६ हजार ५७ मेट्रिक टन धान्याची व ३ लाख ६२ हजार लिटर केरोसिनची विक्रमी बचत झाली आहे. त्यामुळे तब्बल ३ कोटी ९८ लाख २० हजार रुपयांची बचत झाली असल्याची माहिती रायगड जिल्हा पुरवठा अधिकारी एल.एम. दुफारे यांनी दिली. रायगड जिल्हा पुरवठा शाखेमार्फत राबविण्यात आलेल्या विविध उपक्र मांची व त्यामुळे झालेल्या बदलांची माहिती देताना जिल्हा पुरवठा अधिकारी दुफारे म्हणाले, रास्त भाव धान्य दुकानांत आधार एनेबल्ड पब्लिक डिस्ट्रीब्युशन प्रणाली सुरू करण्यात आली असून या प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शासनाकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. जे दुकानदार या प्रणालीची अंमलबजावणी करीत नाहीत त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे. या अंतर्गत ४ रास्त भाव धान्य दुकानांचे निलंबन करण्यात आले असून २० रास्त भाव धान्य दुकानदारांची अनामत रक्कम जप्त करण्याची कारवाई करण्यात आली असल्याचे दुफारे यांनी सांगितले.

या उपाययोजनांच्या अंमलबजावणीमुळे धान्य वाटपामध्ये पारदर्शकता येऊन सर्व लाभार्थ्यांना नियमित व दरमहा योग्य प्रमाणात धान्य मिळण्याची हमी मिळाली आहे. रायगड जिल्ह्यात १३५८ ई-पॉस मशिन बसविण्यात आल्या असून त्याद्वारे माहे सप्टेंबर २०१८ मध्ये ९१.३३ टक्के धान्य वितरण करून रायगड जिल्ह्याने राज्यामध्ये ई-पॉसद्वारे धान्य वितरणामध्ये चौथा क्र मांक मिळविला आहे. तर माहे आॅक्टोबर २०१८ मध्ये ९१.२२ टक्के धान्य वितरण करण्यात आले असल्याचे दुफारे यांनी सांगितले. लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांना प्रतिकिलो ३५ रुपये या दराने प्रतिमाह प्रति शिधापत्रिका एक किलो तूरडाळ तसेच एकूण दोन किलो डाळी (चणाडाळ १ किलो ३५ रु व ४४ प्रती किलो या दराने उडीदडाळ १ किलो) या कमाल मर्यादेत वितरीत करण्याचा शासन निर्णयाच्या अनुषंगाने माहे नोव्हेंबर १८ करिता ३२९७.४२ क्विंटल तूरडाळ मंजूर करण्यात आली. त्याचप्रमाणे १८७० क्विंटल चणाडाळ व ९४० क्विंटल उडीदडाळीचे नियतन मंजूर झाले आहे.
अंत्योदय योजनेच्या प्रत्येक कार्डधारकास एक किलो प्रति कार्डप्रमाणे साखर वितरीत करण्यात येते. त्याचा दर २० रुपये प्रति किलोप्रमाणे आहे. तसेच माहे नोव्हेंबर, २०१८मध्ये दिवाळीनिमित्त प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्याकरिता सुद्धा प्रति कार्ड एक किलोप्रमाणे २० रुपये दराने साखर वितरण सुरू आहे.

केरोसिन वितरणात पारदर्शकता

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत केरोसिन वितरणात पारदर्शकता यावी व पात्र लाभार्थ्यापर्यंत केरोसिन पोहोचावे यासाठी केरोसिन वितरण पॉइंट आॅफ सेल(पॉस) द्वारे करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून त्याची अंमलबजावणी रायगड जिल्ह्यामध्ये सुरू असून ४१५ दुकानांमधून वितरण होते. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत प्राप्त होणारे अनुदानित दराचे केरोसिन केवळ बिगर गॅस
जोडणी शिधापत्रिकाधारकांना अनुज्ञेय आहे.

टोल फ्री क्र मांक सुविधा : पात्र लाभार्थ्यांना लाभ प्राप्त करून घेण्याबाबत कोणतीही अडचण आल्यास सार्वजनिक वितरण व्यवस्था तक्र ार निवारण प्रणाली अंतर्गत आपली तक्र ार टोल फ्री क्र मांक १८००२२/४९५०/१९६७ या क्र मांकावर करण्याची विनामूल्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासनाच्या संकेतस्थळावर सार्वजनिक वितरण व्यवस्थेची संपूर्ण माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Web Title: Raigad fourth in the grain distribution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.