डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची श्रीवर्धनमध्ये मिरवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 12:02 AM2019-04-15T00:02:53+5:302019-04-15T00:03:00+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची बौद्धहितकारणी सभागृह नगरपरिषद -शिवाजी चौक अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली.

Dr. The procession of Babasaheb Ambedkar's image in Shrivardhan | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची श्रीवर्धनमध्ये मिरवणूक

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची श्रीवर्धनमध्ये मिरवणूक

Next

श्रीवर्धन : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची बौद्धहितकारणी सभागृह नगरपरिषद -शिवाजी चौक अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत विविध महापुरुषांची प्रतीकात्मक रूपे तरु णांनी साकारले. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, गौतम बुद्ध, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर यांची रूपे साकारण्यात आली होती.
श्रीवर्धन बौद्धहितकारणी सभागृहात जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देशातील विषमता नष्ट करून सामाजिक समता व स्वातंत्र्य निर्माण करण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. त्यांच्या अथक परिश्रम व प्रयत्नांमुळे देशात स्थैर्य व प्रगती एकत्र साधली जात आहे. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार संविधानाच्या माध्यमातून आंबेडकरांमुळे आपणास प्राप्त झाला आहे, असे प्रतिपादन संजय खैरे यांनी केले.
आंबेडकर हे थोर विचारवंत व जनमाणसावर प्रचंड प्रभाव असलेले लोकनेते होते. आपल्या समाजाची दयनीय व वाईट अवस्था याचे विदारक चित्र त्यांच्या डोळ्यासमोर सदैव असे. परिस्थिती व संघर्ष यांच्याशी सांगड घालत बाबासाहेबांनी अनेक पराक्र म आपल्या विनयशील व महत्त्वाकांक्षी वृत्तीमुळे घडवून आणले. या
कार्यक्र मासाठी बौद्धहितकारणी श्रीवर्धन व मुंबई मंडळाचे संजय मोरे, रमेश खैरे, हरिचंद्र जाधव, दीपक शिर्के, दिनेश तांबे आदीसह बौद्ध समाज बांधव उपस्थित होते.
>मुरु ड वसंतराव नाईक महाविद्यालयात अभिवादन
आगरदांडा : मुरु ड वसंतराव नाईक महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधीसत्त्व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी आदरभाव व्यक्त केला. या वेळी राजकुमार बुटे,भरारी पथकाचे प्रमुख प्रशांत पाटील, सहायक फौजदार रवींद्र घरत आदीसह शासकीय कर्मचारी उपस्थित होते.
नागोठणे ग्रामपंचायतीच्या वतीने डॉ. आंबेडकरांना अभिवादन
नागोठणे : भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती येथील ग्रामपंचायत कार्यालयात साजरी करण्यात आली. सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य सुरेश जैन, ज्ञानेश्वर साळुंके, कल्पना टेमकर आदीसह ग्रामपंचायतीचे कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.

Web Title: Dr. The procession of Babasaheb Ambedkar's image in Shrivardhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.