कर्णबधिर पायलला बारावीत ८०.३० टक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 12:14 AM2019-05-29T00:14:02+5:302019-05-29T00:14:11+5:30

जिद्द आणि चिकाटी असेल तर शारीरिक कमतरतेवर सहज मात करता येते हे पायल पाटील हिने दाखवून दिले आहे.

Deaf person has 80.30% | कर्णबधिर पायलला बारावीत ८०.३० टक्के

कर्णबधिर पायलला बारावीत ८०.३० टक्के

Next

अलिबाग : जिद्द आणि चिकाटी असेल तर शारीरिक कमतरतेवर सहज मात करता येते हे पायल पाटील हिने दाखवून दिले आहे. अलिबागजवळच्या ग्रामीण भागातील घोटवडे येथील पायल नरेश पाटील पूर्णत: कर्णबधिर असलेल्या पायल पाटील या विद्यार्थिनीने बारावीच्या कला शाखेतील परीक्षेत ८०.३० टक्के गुण मिळवून पीएनपी शैक्षणिक संस्थेत प्रथम क्र मांकाने उत्तीर्ण होण्याचा मान पटकाविला आहे. तिने दहावीच्या परीक्षेत सुद्धा ९० टक्के गुण मिळवून ती प्रथम आली होती.
पायलची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तिला पीएनपी शैक्षणिक संस्थेमार्फत पूर्णपणे मोफत शिक्षण दिले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, जिद्द व चिकाटीने मिळवलेले पायलचे हे यश इतरांसाठी प्रेरणादायी आहे. वेश्वी येथील पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या बारावी परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करून पीएनपीची उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. पीएनपी होली चाईल्ड उच्च माध्यमिक इंग्रजी माध्यम स्कूलचा निकाल १०० टक्के, तसेच कला, वाणिज्य व विज्ञान विद्यालयातील एकूण ८७.७६ टक्के निकाल लागला.
पीएनपी विद्यालयातील कला शाखेतील निकाल ८२.२२ टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल ८८ टक्के लागला आहे. मयूर राऊत याने ७७.२३ टक्के गुण मिळवून शाखेत प्रथम येण्याचा मान पटकाविला, तर विज्ञान शाखेचा एकूण निकाल ९०.२४ टक्के लागला असून यामध्ये मानसी म्हात्रे हिने ६२.४६ टक्के गुण मिळवून प्रथम क्र मांक पटकाविला. मानसी म्हात्रे ही विद्यार्थिनी पीएनपी इयत्ता १० वीमध्ये ९०.६०टक्के गुण मिळवून संस्थेत प्रथम क्र मांकाने उत्तीर्ण झाली होती.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या संजीवनी नाईक, पीएनपी होली चाईल्ड स्कूलच्या प्राचार्या गीतिका भूचर, प्रशासन अधिकारी अमित देशपांडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Web Title: Deaf person has 80.30%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.