३ हजार टन कचऱ्याची श्रमदानातून विल्हेवाट; आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविली मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 05:21 AM2019-05-13T05:21:04+5:302019-05-13T05:21:20+5:30

ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या १४ मे रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

3 thousand tons of waste disposal; Campaign implemented for the birthday of Appasaheb Dharmadhikari | ३ हजार टन कचऱ्याची श्रमदानातून विल्हेवाट; आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविली मोहीम

३ हजार टन कचऱ्याची श्रमदानातून विल्हेवाट; आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविली मोहीम

Next

- जयंत धुळप

अलिबाग : ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या १४ मे रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यात ७८ हजार ६१० श्रीसदस्यांनी सहभाग घेऊन तब्बल ३१४५.९० टन कचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावली. त्यामध्ये २०४७.५६ टन सुका तर १०९८.३४ टन ओल्या कचºयाचा समावेश होता.
श्रीसदस्यांनी श्रमदानातून ३३४ सरकारी कार्यालयांचे एकूण १६ लाख ३८ हजार ६०८ चौरस मीटरचे क्षेत्र पूर्णपणे स्वच्छ केले. यामध्ये मुंबई शहरातील १२९, रायगड जिल्ह्यातील १७२, औरंगाबादमधील ४५, पालघरमधील २१, रत्नागिरीतील ३, पुणे जिल्ह्यातील २०, सातारामधील एक आणि गुजरातमधील सिल्व्हासा व उंबरगाव येथील प्रत्येकी पाच कार्यालयांचा समावेश आहे.
८९६ रस्त्यांच्या दुतर्फा एकूण १ हजार ९१६ किलोमीटर लांबीचे क्षेत्र पूर्णपणे स्वच्छ करण्यात आले. यात मुंबई, औरंगाबाद, पुणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सातारा जिल्हा आणि गुजरातमधील रस्त्यांचा समावेश आहे.

७१ स्मशानभूमीची साफसफाई
मुंबई शहरातील बोरीवली ते सांताक्रुझ या टप्प्यातील उपनगरातील २४, वडाळा, घाटकोपर व चुनाभट्टी या उपनगरातील १७ आणि वरळीमधील २३ अशा मुंबईतील एकूण ४८ स्मशानभूमी, तर औरंगाबादमधील २३ स्मशानभूमी अशा एकूण ७१ स्मशानभूमींचे ४ लाख ३१ हजार २७५ चौरस मीटर क्षेत्र स्वच्छ करण्यात आले.

१७ रुग्णालये स्वच्छ
मुंबईतील बोरीवली ते सांताक्रुझ या टप्प्यातील १७ रुग्णालयांतील एकूण ५९ हजार ४७२ चौ.मी. क्षेत्र स्वच्छ करून ही सर्व रुग्णालये चकाचक करण्यात आली. त्याचबरोबर, मुंबईतील ११.६ किमी अंतराचे समुद्र किनारे स्वच्छ करण्यात आले आहेत.
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील दोन रेल्वे स्टेशन्स स्वच्छ करण्यात आली, तर श्रीवर्धन तालुक्यातील एका कुंडातील ५० ब्रास गाळ काढण्यात आला.

महाश्रमदान मोहीम
जिल्हा मनुष्यबळ

मुंबई ३२,२९६
औरंगाबाद २२,१४५
रायगड १७,४४२
पालघर १,४०२
पुणे ४,०१७
सातारा १३०
रत्नागिरी ६७१
गुजरात ५०७
------------------------
एकूण ७८,६१०
------------------------------

Web Title: 3 thousand tons of waste disposal; Campaign implemented for the birthday of Appasaheb Dharmadhikari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :alibaugअलिबाग