आवाज कमी करा पुणेकरांनो, तुम्हाला पर्यावरणाची शपथ आहे !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 09:08 AM2019-06-05T09:08:59+5:302019-06-05T09:10:02+5:30

दिवसेंदिवस वाढती वाहन संख्या, वृक्षतोड, उद्योगधंदे आणि पर्यावरणाकडे अक्षम्य दुर्लक्ष करणाऱ्या पुणेकरांनी सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे.  शहरातील वाढते ध्वनी प्रदूषण धोक्याची पातळी ओलांडून पुणेकरांना रुग्णशय्येवर आणण्याच्या प्रयत्नात आहे.

World Pollution Day : Noise pollution increase day by day | आवाज कमी करा पुणेकरांनो, तुम्हाला पर्यावरणाची शपथ आहे !

आवाज कमी करा पुणेकरांनो, तुम्हाला पर्यावरणाची शपथ आहे !

Next

पुणे :दिवसेंदिवस वाढती वाहन संख्या, वृक्षतोड, उद्योगधंदे आणि पर्यावरणाकडे अक्षम्य दुर्लक्ष करणाऱ्या पुणेकरांनी सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे.  शहरातील वाढते ध्वनी प्रदूषण धोक्याची पातळी ओलांडून पुणेकरांना रुग्णशय्येवर आणण्याच्या प्रयत्नात आहे. या मोठ्या धोक्यापासून वाचायचे असेल आणि मुख्य म्हणजे येणाऱ्या पिढ्यांना वाचवायचे असेल तर काही बदल करावे लागतील. 

पुणे महापालिकेने २०१७-१८साली प्रकाशित केलेल्या पर्यावरण अहवालातून काही गंभीर बाबी समोर आल्या आहेत. यात शहरातील रहिवासी क्षेत्रातील ध्वनी पातळीने धोकेदायक सीमा ओलांडली आहे. रहिवासी क्षेत्रात ५५ डीबी आवाजाची पातळी असताना संपूर्ण शहरात कुठेही ५५ किंवा त्यापेक्षा कमी ध्वनी आढळलेला नाही. इतकेच नाही तर व्यवसायिक आणि शांतता क्षेत्र (शाळा, दवाखाने) अशा जवळील जागांमध्येही आवाज मोठा आहे. याबाबत वेळीच उपाययोजना केल्या नाही तर मोठ्या प्रमाणात हवा आणि पाणी प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेले पुणेकर आता ध्वनी प्रदूषणाने हैराण होताना दिसतील. 

 

रहिवासी क्षेत्र 

कमाल ध्वनी ५५ डीबी
नवी पेठ     ६८ डीबी 

संत ज्ञानेश्वर घाट 

७० डीबी 
रामोशी गेट पोलीस स्टेशन जवळ६५ डीबी 
पुलाची वाडी६१ डीबी 
संत माळी महाराज घाट६१ डीबी 

कात्रज तलाव

५७ डीबी 
फडके हौद चौकाजवळ६१ डीबी 
एरंडवणे५६ डीबी 
राजराम पूल६६ डीबी 
रामवाडी७० डीबी 
खडकवासला६१ डीबी

 

व्यावसायिक भाग

कमाल ध्वनी पातळी ६५ (डीबी )
नळ स्टॉप७१  डीबी 
आरटीओ७८  डीबी 
स्वारगेट७४  डीबी 
मंडई६९  डीबी 
इ-स्केअर जवळ७०  डीबी 
ब्रोमोन चौक७३  डीबी 
आंबेडकर चौक७२  डीबी 
वडगाव बुद्रुक५५  डीबी 

पाषाण

५८  डीबी 

राजीव गांधी पूल

७८  डीबी 
के के मार्केट७८  डीबी 
हॅरिस पूल६८  डीबी 
नळ स्टॉप७१  डीबी 

 

शांतता क्षेत्र 

 कमाल ध्वनी ५० ( डीबी )
पूना हॉस्पिटल४८  डीबी 
ससून हॉस्पिटल५९   डीबी 
नू. म. वि. शाळा५८  डीबी 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ६९  डीबी 
नायडू हॉस्पिटल५७  डीबी 

Web Title: World Pollution Day : Noise pollution increase day by day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.