पुणे महानगरपालिकेने दिला ठिकाण दर्शकांना वेस्टर्न अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 07:24 PM2018-09-29T19:24:52+5:302018-09-29T20:22:02+5:30

पुणे शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना शहराला पारंपारिक लूक बराेबरच वेस्टर्न टच देण्याचा प्रयत्न पुणे महानगपालिकेकडून करण्यात येत अाहे.

western look to information board by pmc | पुणे महानगरपालिकेने दिला ठिकाण दर्शकांना वेस्टर्न अंदाज

पुणे महानगरपालिकेने दिला ठिकाण दर्शकांना वेस्टर्न अंदाज

Next

पुणे : पुणे शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना शहराला पारंपारिक लूक बराेबरच वेस्टर्न टच देण्याचा प्रयत्न पुणे महानगपालिकेकडून करण्यात येत अाहे. बालगंधर्व रंगमंदिराजवळ उभारण्यात अालेल्या ठिकाण दर्शकांना वेस्टर्न अंदाज पालिकेकडून देण्यात अाला अाहे. त्यामुळे सांस्कृतिक शहरात पाश्चिमात्य सजावटीने शहराला एक वेगळेच रुप प्राप्त हाेताना दिसत अाहे. 

    स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात अनेक विकासकामे करण्यात येत अाहेत. त्यातच महापालिकेने सुद्धा शहराला सुंदर बनविण्यासाठी कंबर कसली अाहे. शहरातील रस्ते वेस्टन पद्धतीने तयार करण्याता अाल्याने नागरिकांच्या अाकर्षणाचे ते विषय झाले अाहेत. त्याचबराेबर विविध माहिती देणारे इलेक्ट्राॅनिक स्क्रिन्स पुणे स्मार्ट सिटीकडून शहरातील सर्वच भागात उभारण्यात अाले अाहेत. त्यातच शेअर सायकलला शहरात वाढता प्रतिसाद असल्याने अनेक सायकल कंपन्या या याेजनेत सहभागी झाल्या अाहेत. यापुढे जात अाता महापालिकेकडून पाश्चिमात्य देशांमध्ये ज्या पद्धतीने ठिकाण दर्शक असतात त्याच पद्धतीचे ठिकाण दर्शक उभारण्यात येत अाहेत. 

    अाेंकारेश्वर पुलाच्या चाैकात एक ठिकाण दर्शक फलक उभारण्यात अाला असून त्यावर विविध ठिकाणांची नावे लिहून बाण दाखवण्यात अाले अाहेत. मराठी व इंग्रजी या दाेन्ही भाषांमध्ये हे फलक लावण्यात अाले अाहेत. त्याचबराेबर महापालिकेकडे जाणाऱ्या रस्त्याला जुन्या पद्धतीचे अाकर्षक असे पथदिवे लावण्यात अाले असल्याने या रस्त्याच्या साैंदर्यात अधिक भर पडत अाहे. या विशिष्ट सजावटीमुळे पारंपारिक अाणि पाश्चिमात्य अशा दाेन्ही पद्धतींचा संगम  केल्याचे पाहायला मिळत अाहे. 

Web Title: western look to information board by pmc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.