ई-चलनद्वारे वाहतूक पोलिसांना गंडा घालणारा पोलीसच सापडला जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2017 08:34 PM2017-11-09T20:34:08+5:302017-11-09T20:34:16+5:30

पुणे : ई-चलनद्वारे वाहतूक पोलीस पाठवत असलेल्या मेसेजसारखेच बनावट मेसेज तयार करून दंड भरला असल्याचे भासवत  पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून शासनासह वाहतूक विभागाला गंडा घालणारा पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

Traffic police caught by police in search of e-challan Police found | ई-चलनद्वारे वाहतूक पोलिसांना गंडा घालणारा पोलीसच सापडला जाळ्यात

ई-चलनद्वारे वाहतूक पोलिसांना गंडा घालणारा पोलीसच सापडला जाळ्यात

Next

पुणे : ई-चलनद्वारे वाहतूक पोलीस पाठवत असलेल्या मेसेजसारखेच बनावट मेसेज तयार करून दंड भरला असल्याचे भासवत पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून शासनासह वाहतूक विभागाला गंडा घालणारा पोलिसांच्या जाळ्यात सापडला. तब्बल 399 बनावट मेसेज तयार करून ते 39 व्यक्तींना पाठवत 81 हजार 212 रूपयांची फसवणूक त्याने केल्याचे समोर आले आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान हा प्रकार
सुरू होता.

असिफ अरीफ शेख ( रा. झांबरे पँलेस महर्षीनगर कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेव्हन लव्हज चौकात स्वारगेट वाहतूक पोलीस वाहनांची तपासणी करीत असताना असिफ शेख याने त्याच्या मोबाईलवरील मेसेज दाखवून अगोदरच दंड भरल्याचे सांगितले. पोलिसांना या मेसेजचा संशय आला. त्यांनी तो बारकाईने पाहिला असता बनावट असल्याचे दिसून आले.
मोबाईल तपासला असता स्वत:च्या मोबाईलवर पुणे पोलीस ई चलनद्वारे जसे मेसेज पाठवितात, त्यासारखेच दंड भरल्याचे बनावट मेसेज मोबाईलच्या मेसेज इनबॉक्समध्ये त्याने 39 लोकांना एकूण 399 बनावट मेसेज पाठवल्याचे आढळले.

बनावट मेसेज असूनही ते वाहतूक पोलिसांना दाखवून दंडात्मक कारवाई केल्याचेच हे मेसेज असल्याचे भासवत पोलिसांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीवर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शेषराव सूर्यवंशी व वाहतूक शाखा परिमंडळ 2चे सहायक पोलीस निरीक्षक देवीदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सुदाम पाचोरकर, पोलीस नाईक क्षीरसागर, पोलीस शिपाई जगताप आणि पोलीस शिपाई कोंडे यांनी भाग घेतला होता. स्वारगेटचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Traffic police caught by police in search of e-challan Police found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस