साहित्य महामंडळाच्या सूचनांवर कार्यवाही करा - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 12:01 AM2018-09-06T00:01:23+5:302018-09-06T00:01:43+5:30

मराठी भाषा, साहित्य, संस्कृती जतन-संवर्धनाच्या दृष्टीने साहित्य महामंडळाच्या मागण्या, सूचनांवर कार्यवाही करण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शासनाकडे केले आहे. याबाबतचे पत्र शिक्षण आणि सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांना पाठविले आहे.

Take action on Sahitya Mahamandal's instructions - Congress State President Ashok Chavan | साहित्य महामंडळाच्या सूचनांवर कार्यवाही करा - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण

साहित्य महामंडळाच्या सूचनांवर कार्यवाही करा - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण

पुणे : मराठी भाषा, साहित्य, संस्कृती जतन-संवर्धनाच्या दृष्टीने साहित्य महामंडळाच्या मागण्या, सूचनांवर कार्यवाही करण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शासनाकडे केले आहे. याबाबतचे पत्र शिक्षण आणि सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांना पाठविले आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने डॉ. श्रीपाद जोशी यांनी मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती संदर्भातील मागण्यांबाबतचे निवेदन तावडे यांच्याकडे पाठविले होते. या निवेदनाबद्दल योग्य ती कार्यवाही करावी, या मागण्यांकडे सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष वेधत या प्रयत्नांना बळ पुरविले जाण्याची नितांत गरज आहे, असे चव्हाण यांनी पत्रात म्हटले आहे.
महामंडळाने मराठी भाषा, साहित्य, संस्कृती जतन-संवर्धनासाठी अडीच वर्षांत सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यामधील सुमारे
३० सूचना, मागण्या, निवेदने, ठराव यांचे स्वरूप चव्हाण यांनी केलेल्या या निवेदनात विशद करण्यात आले आहे.
यामध्ये विधान परिषदेवरील घटनाबाह्य नियुक्त्या रद्द करणे, ८४ वर्षे प्रलंबित मराठी विद्यापीठाची मागणी, राज्याचे अद्याप जाहीर न झालेले भाषा धोरण, मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीबाबतची श्वेतपत्रिका, अनुवाद अकादमी आणि बोली विकास केंद्राची स्थापना, अभिजात दर्जासंबंधी चाललेली चालढकल, बंद पडत असलेल्या प्राथमिक शाळा, बृहन्महाराष्ट्रासाठी स्वतंत्र भाषा धोरण, राज्य सांस्कृतिक विकास महामंडळाची स्थापना आदींचा समावेश आहे.
मराठी भाषेबाबतच्या मागण्या शासन दरबारी पडून असून त्यांच्या पूर्ततेसाठी प्रत्यक्ष राजकीय कृती करण्याचे आवाहन जोशी यांनी सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांना केले आहे.

Web Title: Take action on Sahitya Mahamandal's instructions - Congress State President Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.