न्यायालयाच्या आवारात पक्षकाराचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 21:09 IST2018-03-06T21:09:20+5:302018-03-06T21:09:20+5:30
पिंपरी : न्यायालयाच्या परिसरात अरविंद कसबे (वय ३२,रा.निगडी) या पक्षकाराने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्नकेला. वकिलाने मध्यस्थी करून त्यास आत्महत्या करण्यापासून रोखले.

न्यायालयाच्या आवारात पक्षकाराचा आत्महत्येचा प्रयत्न
ठळक मुद्देपोलीस घटनास्थळी धावून गेले. त्यांनी कसबे यास ताब्यात घेतलेघरगुती वादाचा खटला न्यायालयात दाखल आहे. खटल्याच्या सुनावणीसाठी तो न्यायालयात आला होता.
पिंपरी : पिंपरी चिंचवड न्यायालयाच्या परिसरात अरविंद कसबे (वय ३२,रा.निगडी) या पक्षकाराने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्नकेला. वकिलाने मध्यस्थी करून त्यास आत्महत्या करण्यापासून रोखले. पोलीस घटनास्थळी धावून गेले. त्यांनी कसबे यास ताब्यात घेतले. घरगुती वादाचा खटला न्यायालयात दाखल आहे. .खटल्याच्या सुनावणीसाठी तो न्यायालयात आला होता. अचानक त्याने अंगावर रॉकेल ओतून घेतले. स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे.