लोणी काळभोर येथे बारावीत नापास झाल्याने परप्रांतीय विद्यार्थिनीची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 04:54 PM2019-04-16T16:54:49+5:302019-04-16T16:58:44+5:30

१५ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता तिच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल लागला. तिला हा निकाल ऑनलाईन समजला.

student suicides due to failed in 12th Loni Kalbhor | लोणी काळभोर येथे बारावीत नापास झाल्याने परप्रांतीय विद्यार्थिनीची आत्महत्या 

लोणी काळभोर येथे बारावीत नापास झाल्याने परप्रांतीय विद्यार्थिनीची आत्महत्या 

Next

लोणी काळभोर : इयत्ता बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने आलेल्या नैराश्यातून मावशीच्या घरी पाहुुुणी म्हणून आलेल्या एका परप्रांतीय मुलीने साडीच्या सहाय्याने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. शेखर राजू शेट्टी (वय ६०, रा. सुंदर संकुल, मगरपट्टा रोड, हडपसर) यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी शेखर शेट्टी यांचे मेव्हणे कुट्टी बाबू शेट्टी ( वय ६०, रा. गुजर वस्ती, कवडीपाट, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर ) येथे राहायला आहेत. 
पिंकी जया शेट्टी  (वय १९, मुळ गाव मॅग्लोरोना, ता. मंगळूर, जि. म्हैसूर, कर्नाटक राज्य )असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , पिंकी शेट्टी ही कर्नाटक राज्यात तिच्या गावी इयत्ता बारावीत शिकत होती. १४ एप्रिल रोजी ती गावाहून कवडीपाट येथे मावशीच्या घरी आली होती.१५ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता तिच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल लागला. तिला हा निकाल ऑनलाईन समजला. या परीक्षेत ती नापास झाली. त्यानंतर आलेल्या नैराश्यातून बेडरूममधील पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस करत आहेत.  

Web Title: student suicides due to failed in 12th Loni Kalbhor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.