राज्य सरकारचे जनतेच्या आरोग्याकडे दुर्लक्ष- दिलीप वळसे-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 02:52 AM2018-08-24T02:52:27+5:302018-08-24T02:53:01+5:30

वैद्यकीय अधिकारी, परिचारिका पदे भरण्याची आवश्यकता असून सरकारचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी केला

State government's ignorance of public health - Dilip Walse-Patil | राज्य सरकारचे जनतेच्या आरोग्याकडे दुर्लक्ष- दिलीप वळसे-पाटील

राज्य सरकारचे जनतेच्या आरोग्याकडे दुर्लक्ष- दिलीप वळसे-पाटील

googlenewsNext

टाकळी हाजी : राज्य सरकार जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नाबाबत गंभीर नाही. वैद्यकीय अधिकारी, परिचारिका पदे भरण्याची आवश्यकता असून सरकारचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी केला.
पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने कवठे येमाई (ता. शिरूर ) येथे मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन केले होते. शिबीराचे उद्घाटन आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते, झाले. अध्यक्षस्थानी माजी आमदार पोपट गावडे होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील,कृषी सभापती सुजाता पवार, सभापती विश्वास कोहकडे, माजी सभापती सुभाष उमाप, जिल्हा परिषद सदस्या सुनिता गावडे, सविता बगाटे, स्वाती पाचुंदकर, राजेंद्र जगदाळे, कुसुम मांढरे, उपसभापती मोनिका हरगुडे, प्रकाश पवार, मानसिंग पाचुदकर, राजेंद्व गावडे, रंगनाथ थोरात, वर्षा शिवले, गटविकास अधिकारी संदीप जठार, उप अभियंता महेंद्र कोठारी, अरुणा घोडे, प्रदीप वळसे पाटील, सविता पºहाड, तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र शिंदे, डॉ चंद्रकांत ढगे, सरपंच दिपक रत्नपारखी, सुदाम ई चके, बाळासाहेब डांगे आदी उपस्थित होते.
यावेळी वळसे पाटील म्हणाले की, ‘‘ग्रामिण भागातील महिलांच्या आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असुन, वैदयकीय सेवा वेळेत मिळत नसल्याने अनेक रूग्ण दगावतात. ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणाबरोबरच आरोग्याला महत्व दिले पाहीजे.
पुणे जिल्हा परिषदेने शाळा, महाविद्यालयामधील मुलींच्या रक्तातील हिमोग्लोबीनची तपासणी करण्यासाठी मोहीम हाती घ्यावी. ’’ आरोग्य शिबीरात ५ हजार ३६५ रूग्णांनी तपासणी करुन घेतली. डॉ.चंद्रकांत ढगे यांनी चष्मे वाटप केले. १२८ लोकांची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. संचालक राजेंद्र गावडे, तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी प्रयत्न केले.

Web Title: State government's ignorance of public health - Dilip Walse-Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.