‘तिने’ चार वर्षांपासूनचे जटांचे ओझे केले बाजूला 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 04:05 PM2019-06-10T16:05:22+5:302019-06-10T16:06:14+5:30

चार वर्षांपूर्वी एक महिना आजारी असल्याने सुमन पाटोळे यांनी एक महिना केस धुतलेच नाहीत याची जटा तयार झाली आणि नंतर याचे अंधश्रद्धेत रूपांतर झाले.

She 's cutting of burden hair after the four years | ‘तिने’ चार वर्षांपासूनचे जटांचे ओझे केले बाजूला 

‘तिने’ चार वर्षांपासूनचे जटांचे ओझे केले बाजूला 

googlenewsNext
ठळक मुद्देकरंजेपूल येथील घटना : अंधश्रद्धेच्या विळख्यातून काढले बाहेर 

सोमेश्वरनगर :  सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथील करंजेपुल ग्रामपंचायत परिसरातील गायकवाड वस्ती येथील सुमन अशोक पाटोळे यांनी  ४  वर्षांपासूनचे डोक्यावरील जटांचे ओझे शनिवार (दि.८) बाजूला केले. 
त्यासाठी रयत विज्ञान परिषदेचे समन्वयक डॉ सुधीर कुंभार यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या जटा काढून त्यांन अंधश्रद्धा विळख्यातून बाहेर काढले आहे. अंधश्रद्धापोटी वाढवलेल्या जटा काढून रयत परिषद कार्यकर्त्यांना अंधश्रद्धा यातून त्यांची मुक्तता केली आहे. 
चार वर्षांपूर्वी एक महिना आजारी असल्याने सुमन पाटोळे यांनी एक महिना केस धुतलेच नाहीत याची जटा तयार झाली आणि नंतर याचे अंधश्रद्धेत रूपांतर झाले.  झालेली ही जटा आल्यानंतर अंधश्रद्धा व परंपरा, असल्यामळे वाढवल्या होत्या. 
आपल्या घरातल्यांना कोणताही त्रास होऊ नये, देवीचा प्रकोप होऊ नये, मात्र ही अंधश्रद्धा आहे आणि याची जाणीव झाल्यानंतर घरच्यांच्या मदतीने आज जटा मुक्त झाल्याने आनंद होत असल्याचे सुमन पाटोळे सांगतात.  खरंतर ग्रामीण भागातील महिला जटामुक्त व्हाव्यात, अशी संकल्पना राबविण्याच्या दृष्टीने सुमन पाटोळे यांनी उचललले पाऊल मोठे योगदान ठरणार आहे, असे सांगत रयत पारिषदेचे डॉ कुंभार, गोरख तावरे आणि डॉ काशिनाथ सोलनकर यांनी त्यांना जटामुक्त केले . 
त्यांच्या चेह-यावरील हास्य पाहताच उपस्थित महिलांना व त्यांच्या कुटुंबाला आंनद झाला. यावेळी दादासाहेब थोरात, सामाजिक कार्यकर्ते राजू बदडे, लक्ष्मण लकडे, राहुल पाटोळे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. 

Web Title: She 's cutting of burden hair after the four years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.