पुण्यात एअर फोर्स शाळेच्या मैदानावर हँड ग्रेनेड सदृश्य वस्तू सापडल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 03:09 PM2019-05-14T15:09:22+5:302019-05-14T15:13:33+5:30

हँड ग्रेनेड असल्याचे वाटल्याने पोलीस तसेच वायु दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने तिकडे धाव घेतली़.

Sensation..! same of hand grenade things has been found in the Air Force School ground in Pune | पुण्यात एअर फोर्स शाळेच्या मैदानावर हँड ग्रेनेड सदृश्य वस्तू सापडल्याने खळबळ

पुण्यात एअर फोर्स शाळेच्या मैदानावर हँड ग्रेनेड सदृश्य वस्तू सापडल्याने खळबळ

Next

पुणे : लोहगाव येथील एअर फोर्सच्या शाळेच्या मैदानात मंगळवारी सकाळी हँड ग्रेनेड सदृश्य स्फोटक वस्तू सापडल्याने एकच खळबळ उडाली होती़. सुरुवातीला हा हँड ग्रेनेड असल्याचे वाटल्याने पोलीस तसेच वायु दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने तिकडे धाव घेतली़ बॉम्बशोधक व नाशक पथकाने ही स्फोटक वस्तू दुपारी १२ वाजता डिस्पोज केली़. 
याबाबतची माहिती अशी,  एअर फोर्सच्या शाळेच्या मैदानात मुले खेळत होती़. सकाळी साडेनऊ वाजता त्यांना एक संशयास्पद वस्तू आढळून आली़. त्यांनी याची माहिती शिक्षकांना दिली़ त्यांना तो हँड ग्रेनेड सदृश्य वाटल्याने त्यांनी तातडीने विमानतळ पोलिसांना कळविले़. 
 त्यांना ती संशयास्पद वाटल्याने त्यांनी विमानतळ पोलिसांना कळविले़. पोलिसांनी तातडीने बॉम्बशोधक व नाशक पथकाला याची माहिती दिली़. हे पथक तातडीने घटनास्थळी गेले़ ती वस्तू पाहिल्यानंतर प्रथमदर्शनी तो हँड ग्रेनेड असल्याचे वाटले़. हँड ग्रेनेड हा लोखंडी असतो़ तो प्लास्टिकचा होता़. त्यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथकाने ही स्फोटक वस्तू निकामी केली़. दिवाळीतील फटाक्यांची दारू भरलेली ही वस्तू असल्याचे दिसत आहे़. 
याबाबत पोलीस उपायुक्त मितेश घट्टे यांनी सांगितले की, पोलीस नियंत्रण कक्षाला सकाळी माहिती मिळाल्यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथक तातडीने घटनास्थळी गेले़. सुरुवातीला ती वस्तू हँड ग्रेनेडसारखी वाटत होती़.  ती वस्तू निकामी केली आहे़. दिवाळीतील फटाक्याच्या दारु भरलेली ती प्लॉस्टिकची वस्तू होती़. त्याचे सँपल तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे़ त्याच्या तपासणीनंतरच ती वस्तू नेमकी काय होती हे समजून येईल.

Web Title: Sensation..! same of hand grenade things has been found in the Air Force School ground in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.