अनाथ हिंदू महिला आश्रमाची जबाबदारी पेलणाऱ्या रोहिणी गोविंद खरे यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2017 10:40 AM2017-10-24T10:40:13+5:302017-10-24T10:40:23+5:30

अनाथ हिंदू महिला आश्रमाची जबाबदारी वर्षानुवर्षे सक्षमतेने पेलणाऱ्या रोहिणी गोविंद खरे यांचे सोमवारी रात्री वृद्धपकाळाने निधन झाले.

Rohini Govind Khare passed away as an orphan Hindu women ashram | अनाथ हिंदू महिला आश्रमाची जबाबदारी पेलणाऱ्या रोहिणी गोविंद खरे यांचं निधन

अनाथ हिंदू महिला आश्रमाची जबाबदारी पेलणाऱ्या रोहिणी गोविंद खरे यांचं निधन

googlenewsNext

पुणे- अनाथ हिंदू महिला आश्रमाची जबाबदारी वर्षानुवर्षे सक्षमतेने पेलणाऱ्या रोहिणी गोविंद खरे यांचे सोमवारी रात्री वृद्धपकाळाने निधन झाले. त्या 91 वर्षांच्या होत्या. लोकमान्य टिळकांच्या नात तसेच जेष्ठ नेते कै. जयंतराव टिळक यांच्या त्या भघिनी होत्या. त्यांनी सरस्वती मंदिर विद्यालय येथे 27 वर्षे अध्यापनाचे देखील काम केले होते. अत्यंत मनमिळावू असा त्यांच्या स्वभाव होता. सामाजिक कामाची व खेळाची त्यांना आवड होती. त्यांना स्वयंसिद्धा पुरस्काराने गौरवण्यात आले होते. तसेच पुणे फेस्टिवलमध्येही त्यांचा सन्मान करण्यात आला होता. त्यांच्या मागे मुलगी, मुलगा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Rohini Govind Khare passed away as an orphan Hindu women ashram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.