मतदार नोंदणीसाठी उरले काही तास; पुणे,बारामतीसाठी सोमवारपर्यंतची मुदत 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 07:17 PM2019-03-23T19:17:08+5:302019-03-23T19:24:27+5:30

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ३१ मार्च रोजी जिल्ह्यातील मतदार यादी जाहीर केली. त्यानंतरही शनिवारी व रविवारी विशेष मतदार नोंदणी मोहिम राबविण्यात आली.

The remaining few hours for voter registration; The deadline for Pune, Baramati Monday | मतदार नोंदणीसाठी उरले काही तास; पुणे,बारामतीसाठी सोमवारपर्यंतची मुदत 

मतदार नोंदणीसाठी उरले काही तास; पुणे,बारामतीसाठी सोमवारपर्यंतची मुदत 

Next
ठळक मुद्देपहिल्या व दुस-या टप्प्यात मतदान होणा-या लोकसभा मतदार संघातील मतदार नोंदणीच्या तारखा संपुष्टात ऑनलाईन मतदार नोंदणी करून घ्या 

पुणे: लोकसभा निवडणूकीसाठी मतदार नोंदणी करण्यास अवघे काही तास उरले आहेत.त्यामुळे काही कारणाने मतदार नोंदणी करण्याचे राहून गेले असल्यास पुणे व बारामती मधील नागरिकांना येत्या २५ मार्चपर्यंत तर शिरूर व मावळ मतदार संघातील मतदारांना ३० मार्चपर्यंत नोंदणी करता येणार आहे. या कालावधीनंतर ऑनलाईनपध्दतीने मतदार नोंदणी अर्ज करता येणार नाही, असे निवडणूक आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
लोकशाही प्रधान देशात मतदार महत्त्वाचा घटक मानला जातो. या मतदाराने दिलेल्या अमुल्य मताच्या आधारेच लोकसभेच्या उमेदवारांचे भवितव्य ठरते. त्यामुळेच निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने मतदार नोंदणीसाठी विविध कार्यक्रम राबविले. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ३१ मार्च रोजी जिल्ह्यातील मतदार यादी जाहीर केली. त्यानंतरही शनिवारी व रविवारी विशेष मतदार नोंदणी मोहिम राबविण्यात आली.
निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार नमुना अर्ज ६ भरून केली जाणारी मतदार नाव नोंदणी करता येते.परंतु,नामनिर्देशन ( उमेदवारी अर्ज ) दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत हे अर्ज निकाली काढून नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या शेवटच्या दिवसाच्या १० दिवस अगोदरपर्यंत प्राप्त झालेले मतदार नोंदणी अर्ज निकाली काढावेत, असे निर्देश राज्याचे उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी अ.ना.वळवी यांनी सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिका-यांना दिले आहेत. त्यानुसार पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाकडून येत्या २५ मार्चपर्यंतच पुणे व बारामती मतदार संघातील मतदारांचे तर ३० मार्चपर्यंतच शिरूर व मावळ मतदार संघाच्या मतदारांचे अर्ज आॅनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. 
राज्यात चार टप्प्यात निवडणूका घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या मतदार संघासाठी मतदार नोंदणीची अंतिम तारीख वेगळी आहे. पहिल्या व दुस-या टप्प्यात मतदान होणा-या लोकसभा मतदार संघातील मतदार नोंदणीच्या तारखा संपुष्टात आल्या आहेत. पुणे व बारामती मतदार संघाची निवडणूक तिस-या टप्प्यात असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ४ एप्रिल आहे. त्यामुळे या मतदार संघात केवळ २५ मार्चपर्यंतच मतदार नोंदणी करता येईल. तर शिरूर व मावळ मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ९ एप्रिल असल्यामुळे ३० मार्चपर्यंतच मतदारांना नाव नोंदणी करता येईल.त्यानंतर अर्जांची छाननी करून अंतिम मतदार यादी तयार केली जाईल. 
----------------
ऑनलाईन मतदार नोंदणी करून घ्या 
निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून आॅनलाईन पध्दतीने मतदार नोंदणी अर्ज स्वीकारला जात आहे. याच संकेतस्थळावर मतदार यादीत नाव आहे किंवा नाही याची तपासणी करता येते.जिल्ह्यातील नवमतदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नवमतदारच जिल्ह्यातील खासदार ठरवतील,असे बोलले जात आहे.

Web Title: The remaining few hours for voter registration; The deadline for Pune, Baramati Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.