पुणेरी पगडी नाकारणे हा पुणेकरांचा अपमान, संजय राऊत यांचा शरद पवार यांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 19:13 IST2018-06-12T19:13:02+5:302018-06-12T19:13:02+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणेरी पगडी नाकारून पुणेकरांचा अपमान केला असल्याची तिखट प्रतिक्रिया शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दिली.

पुणेरी पगडी नाकारणे हा पुणेकरांचा अपमान, संजय राऊत यांचा शरद पवार यांना टोला
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणेरी पगडी नाकारून पुणेकरांचा अपमान केला असल्याची तिखट प्रतिक्रिया शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दिली. एवढेच नव्हे तर पुण्यातल्या एका कार्यक्रमात संजय राऊत यांनी पगडी परिधानही केली.
रविवारी पुण्यात पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी आवर्जुन छगन भुजबळ यांचा पुणेरी पगडी ऐवजी फुले पगडी घालून सन्मान केला. त्यावरून राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.
शिवसेनेनेही आता या वादात उडी घेतली असून राऊत यांनी पुण्यातल्या कार्यक्रमात पवार यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, पवार यांनी पगडी नाकारून पुणेकरांचा अपमान केला आहे.त्यांच्या प्रत्येक कृतीमागे काहीतरी अर्थ दडलेला असतो. या मागचा अर्थही लवकरच समोर येईल अशी शक्यताही त्यांनी वर्तवली.