पुणे महापालिकेचा अट्टाहास स्वच्छतेसाठी की केवळ पुरस्कार मिळविण्यासाठी?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 12:47 PM2019-11-16T12:47:03+5:302019-11-16T12:55:22+5:30

शहरामध्ये जागोजागी कचऱ्याचे साम्राज्य; उपनगरामध्ये परिस्थिती अधिक गंभीर

Pune Municipality forced to clean up or just get the award? | पुणे महापालिकेचा अट्टाहास स्वच्छतेसाठी की केवळ पुरस्कार मिळविण्यासाठी?

पुणे महापालिकेचा अट्टाहास स्वच्छतेसाठी की केवळ पुरस्कार मिळविण्यासाठी?

Next
ठळक मुद्देसध्या शहरामध्ये केंद्र शासनाचे स्वच्छ सर्वेक्षण अभियान सन २०२०

पुणे : शहरामध्ये जागोजागी रस्त्यांच्या कडेला पडलेले कचऱ्याचे ढीग, फुटपाथवर अन्य पदार्थ व विविध गोष्टींचा कचरा, काही ठिकाणी लहान-मोठी मृत जनावरे,  ठिकठिकाणी महिनोन्महिने पडलेला राडारोडा, उद्यांनामध्ये पडलेला कचरा, भिकाऱ्यांनी फुटपाथवर थाटलेली घरे ही वस्तुस्थिती शहरामध्ये सर्वत्र असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीमध्ये निदर्शनास आले. 
सध्या शहरामध्ये केंद्र शासनाचे स्वच्छ सर्वेक्षण अभियान सन २०२० राबविण्यात येत आहे. याअतंर्गत महापालिकेकडून स्वच्छ सर्वेक्षणातंर्गत स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळविण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने दिवसरात्र काम सुरू आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करणे, स्वच्छता अभियानामध्ये विविध सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालयांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनाच्या पातळीवर हे प्रयत्न सुरु असले तरी ग्राऊंड पातळीवर मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. याबाबत 'लोकमत' च्या वतीने शहरामध्ये विविध भागांत स्वच्छतेसंदर्भात पाहणी करण्यात आली. यामध्ये वरील वस्तुस्थिती समोर आली. 


सिंहगड रस्त्यावर वडगाव पूल, कॅनॉल रस्त्यासह अनेक ठिकाणी जागोजागी कचऱ्याचे ढीग पडलेले दिसतात. राजाराम पूल, माणिकबाग, संतोष हॉललगतच्या परिसरामध्ये रस्ता, फुटपाथवरच गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात रस्त्यांच्या कामांचा राडारोडा तसाचा पडून आहे. या भागात राजाराम पुलापासून थेट नांदेड सिटीमध्ये अनेक ठिकाणी फुटपाथवरच जागोजागी भिकाºयांनी संसार थाटले असून, फुटपाथ प्रचंड घाण केले आहेत.   संपूर्ण वडगाव शेरी भागातील नागरिक सध्या रस्त्यांवर पडलेल्या कचºयामुळे त्रस्त आहेत. 
महापालिकेला तक्रार करूनदेखील याबाबत सुधारणा होताना दिसत नाही. या परिसरामध्ये अनेक ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा पडला की या परिसरातून टू व्हिलर चालवणेदेखील कठीण होते. तर काही भागांत नियमितपणे मृत जनावरे आणून टाकली जात असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. सारसबागेत ठिकठिकाणी प्लॅस्टिक बाटल्या, भेळीचे कागद, प्लॅस्टिक पिशव्या अस्ताव्यस्त पडलेल्या असतात. इथे असणाºया कचराकुंड्या भरून वाहत आहे. तर काही तशाच मोकळ्या पडलेल्या आहेत. स्वच्छतागृहाची अवस्था फार बिकट आहे. पादचारी रस्त्यावर नागरिक शेंगांचे टरफले, वेष्टणे, खाण्याच्या पदार्थांची पाकिटे टाकताना दिसतात. बसस्थानकांवर प्रवासी बेफिकीरपणे कचरा फेकून देतात. आजूबाजूच्या रस्त्यांवर कचऱ्याच्या पिशव्या फेकलेले आढळून येतात. बसस्थानकावरील स्वच्छतागृहाची अवस्था दयनीय झाली आहे. स्वच्छतागृहात दारूच्या बाटल्या, रिकामे प्लॅस्टिक ग्लास, प्लॅस्टिक बाटल्या सर्वत्र पडलेल्या आहेत. मित्रमंडळ चौकात देखील कचऱ्याची हीच स्थिती असून, या भागात रस्त्यांच्या कामात राडारोडादेखील ठिकठिकाणी पडलेला आहे. 

गुरुवार पेठेतील बलवार आळीत घंटागाडी येत नसल्याने, तर गंज पेठेतील मासे आळीत घंटागाडी येत असून, तेथील व्यावसायिकाचा कचरा घंटागाडी घेत नसल्याने तिथे कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. यामुळे अत्यंत दुर्गंधीयुक्त कचरा येथील व्यावसायिक रस्त्याच्या कडेला असलेल्या कचरापेटीत टाकतात. ही कचरापेटी दररोज ओसंडून वाहत असल्याने गंभीर परिस्थिती आहे. 
......................
या विभागात एकच कचरापेटी आहे .व्यावसायिकांच्या चिकन, माश्यांचा कचरा टाकायला दुसरा पर्याय नाही. ही कचरापेटी नसेल तर रस्ताभर कचरा होईल. घंटागाडीवाले फक्त घरगुती कचरा घेऊन जात असल्यामुळे आम्हाला याच कचरापेटीत कचरा टाकावा लागतो. व्यावसायिक लोकांना कचरा टाकण्यासाठी दुसरा पर्याय निर्माण करून द्यावा.- गणेश परदेशी, गंज पेठ, मासे आळी.
..................
काही विभागात सकाळी-संध्याकाळी घंटागाडी येते. तर बळवार, धनगर आळीत एकही वेळेस घंटागाडी येत नाही. कचरा ओला सुका वर्गीकरण अजिबात करत नाहीत. आमचं दुकान समोरच असल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे  लागते. परिसरात दुर्गंधी पसरलेली असते आणि चार नगरसेवक असूनही या प्रश्नांकडे कोणीच गांभीर्याने लक्ष देत नाहीत.- अमोल उणेचा, गुरुवार पेठ, बलवार आळी
..........
आमच्या भागामध्ये कचरा घेऊन जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. यामुळे नागरिक ऑफिस व कामाला जाताना कचरा रस्त्यांच्या कडेला टाकून देतात. दररोज कचरा तसाच पडून राहत असून, दिवसेंदिवस कचरा वाढत आहे. पण त्या भागातील लोक तक्रार करत नाहीत. आम्हाला त्याच भागातून ये-जा करावी लागते; पण ते लोक तक्रार करत नाही. त्यामुळे आम्ही काही बोलत नाही. 
- सीमा नऱ्हे , माळवाडी 
........

Web Title: Pune Municipality forced to clean up or just get the award?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.