ऊसतोड कामगारांसाठी तात्काळ फिरते स्वच्छतागृह व आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्या- ना. डॉ. नीलम गोऱ्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 05:33 PM2019-07-09T17:33:13+5:302019-07-09T17:33:31+5:30

फिरते स्वच्छतागृह व आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात यावेत, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. 

Provide toilet and health care facilities for the sugarcane workers | ऊसतोड कामगारांसाठी तात्काळ फिरते स्वच्छतागृह व आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्या- ना. डॉ. नीलम गोऱ्हे

ऊसतोड कामगारांसाठी तात्काळ फिरते स्वच्छतागृह व आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्या- ना. डॉ. नीलम गोऱ्हे

googlenewsNext

पुणे : राज्यातील ऊसतोड कामगारांसाठी तात्काळ फिरते स्वच्छतागृह व आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात यावेत, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियेसंबंधी राज्यस्तरीय समितीची आढावा बैठक आज पुणे येथील कौन्सिल हॉल सभागृहात घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी बैठकीसाठी डॉ. प्रदीप व्यास-प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉ. दीपक म्हैसेकर-विभागीय आयुक्त पुणे, राजीव जाधव-कामगार आयुक्त, शेखर गायकवाड-साखर आयुक्त, डॉ. अर्चना पाटील-संचालक आरोग्य सेवा, डॉ. अशोक थोरात-जिल्हा शल्यचिकित्सक बीड, डॉ.अनिरुद्ध देशपांडे, डॉ. मधुसूदन कर्नाटकी आदी अधिकारी उपस्थित होते.

ना. डॉ. गोऱ्हे यांनी सविस्तर सूचना देताना राज्यातील ऊसतोड कामगारांचे प्रश्न आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्या लवकरात लवकर सोडवणे गरजेचे आहे. कारखान्याच्या ठिकाणी स्वच्छतागृहे आहेत अथवा नाहीत याची माहिती कामगार विभागाने घ्यावी व ज्या ठिकाणी स्वछतागृहे नाहीत अशा ठिकाणी फिरते स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्यात यावे. आरोग्य विषयक तक्रारीचे निराकरण करण्यासाठी हंगाम सुरू होण्यापूर्वी नियमितपणे आरोग्य, कामगार विभाग व साखर आयुक्तालयाच्या पुढाकारातून ऊसतोड कामगारांची आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश ना. डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या. ऊसतोड कामगारांना कोयता पध्दतीने वेतन न देता समान  पद्धतीने वेतन देण्यात यावे. कामगारांना आरोग्य विषयक सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी कारखान्याच्या  परिसरात फिरते हॉस्पिटल उपलब्ध करून देण्यात यावे, अशाही सूचना ना. डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.

ऊसतोड कामगार महिलामध्ये गर्भाशय काढून टाकण्याचे प्रमाण वाढत आहे. या बाबत चिंता व्यक्त  करून  महिला कामगारांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी त्यांचे समुपदेशन करणे व आवश्यक  सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. ऊसतोड महिला कामगारांच्या विविध समस्या जाऊन घेऊन त्या सोडविण्यासाठी सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे हे काम व्यवस्थित पार पाडण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी व हे सर्वेक्षण 30 जुलै 2019 पूर्वी अहवाल सादर करावा, अशा सूचना ना.डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी केल्या.

प्रधान सचिव डॉ.  प्रदीप व्यास यांनी ऊसतोड कामगार यांना आवश्यक आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी तसेच फिरते रुग्णालय उपलब्ध देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे स्पष्ट केले. कामगार आयुक्त राजीव जाधव म्हणाले, ऊसतोड कामगारांसाठी आरोग्यविषयक योजना राबविण्यासाठी कामगार विभाग निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे सांगितले. शेखर गायकवाड साखर आयुक्त यांनी याबाबत सर्व साखर कारखान्यांना सूचना देण्यात येतील, असे सांगितले.

Web Title: Provide toilet and health care facilities for the sugarcane workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.