संगीताचे प्रस्तुतीकरण आणि शास्त्र यांचे नाते बिंब-प्रतिबिंबासारखे : प्रभा अत्रे यांची विशेष मुलाखत 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 08:59 PM2018-09-10T20:59:37+5:302018-09-10T20:59:57+5:30

शास्त्र आणि परंपरा यांच्याकडे डोळसपणे पाहत संगीत प्रस्तुतीकरण करणे, ही कलाकाराची जबाबदारी असते....प्रभा अत्रे

Presentation of music and the relationship between scripture is like mirror image: Prabha Atre's special interview | संगीताचे प्रस्तुतीकरण आणि शास्त्र यांचे नाते बिंब-प्रतिबिंबासारखे : प्रभा अत्रे यांची विशेष मुलाखत 

संगीताचे प्रस्तुतीकरण आणि शास्त्र यांचे नाते बिंब-प्रतिबिंबासारखे : प्रभा अत्रे यांची विशेष मुलाखत 

Next
ठळक मुद्देस्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार

प्रज्ञा केळकर-सिंग 
गानवर्धन संस्था आणि शारंग नातू प्रणित तात्यासाहेब नातू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार यावर्षी जयपूर अत्रौली घराण्याच्या विख्यात गायिका पंडित डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. याप्रसंगी किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी रागसंगीतातील बारकावे, सद्यस्थितीत कलाकारांसमोरील आव्हाने, संगीत प्रस्तुतीकरण आणि शास्त्र यांच्यातील संबंध याबाबत नेमकेपणाने भाष्य करत रसिकांना रागसंगीताचा प्रवासच घडवला.

..............................

लोकमतच्या वाचकांसाठी त्यांचे अध्यक्षीय मनोगत सविस्तर स्वरुपात : 

आजवर इतक्या दूर सुरांच्या वाटेवर मी माझ्या आनंदासाठी चालत राहिले. या वाटचालीत रसिकांनाही आनंद दिल्याचे समाधान वाटते. या वाटेवर थांबता येत नाही, चालतच राहावे लागते. शास्त्रीय संगीताचा वारसा जबाबदारीने, जाणतेपणाने पुढे नेणा-या कलाकारांमध्ये अश्विनीचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. बहुतेक लोकांना संगीत केवळ ऐकायला आवडते, संगीतशास्त्र, त्यावरील चर्चा, तंत्र आवडत नाही. संगीतासारख्या अमूर्त कलेला समजून घेण्यासाठी वाचन, चर्चा या गोष्टी आवश्यक आहेत. कलाकार आणि श्रोते जेव्हा एका स्तरावर येतात, तेव्हा निर्मितीचा स्तरही उंचावतो. 
संगीताचे प्रस्तुतीकरण आणि शास्त्र यांचे नाते बिंब-प्रतिबिंबासारखे असते. या नात्यात आज दुरावा निर्माण झाला आहे. शास्त्र आणि परंपरा यांच्याकडे डोळसपणे पाहत संगीत प्रस्तुतीकरण करणे, ही कलाकाराची जबाबदारी असते. विज्ञान-तंत्रज्ञान, झपाट्याने बदलणारी जीवनपध्दती, राजकीय अस्थिरता, सामाजिक उदासिनता, निष्क्रियता, बाहेरचे सांस्कृतिक आक्रमण या परिस्थितीत शास्त्रीय संगीत जपणे, जिवंत ठेवणे, संगीताचा आत्मा सुरक्षित ठेवून समृध्द करण्याचे मोठे आव्हान आजच्या कलाकारांसमोर आहे. संगीतात काळानुसार बदल होत असतात. प्रस्तुतीकरणाबरोबर शाास्त्रानेही बदलणे आवश्यक असते. कलेचा प्रवास परिपक्वतेच्या वाटेवर सतत सुरु असतो. या प्रवासात कलास्वरुपात अनेक स्थित्यंतरे होत असतात, त्यांची नोंद घ्यायची असते. परंतु, वर्तमानकाळातील आविष्कारासाठी सर्वस्वी मागचे संदर्भ घेणे चुकीचे ठरु शकते. विकासाच्या मार्गावर मूळ स्त्रोतापासून वर्तमान आविष्कार दूर गेला नाही ना, एवढीच काळजी घ्यायची असते. विशिष्ट नियमांच्या आधारे एखादी कलाकृती निर्माण होते, तेव्हा ते नियम निश्चित करावे लागतात, कसोशीने पाळावे लागतात. नियमांच्या चौकटीत राहूनच मुक्त होता आले पाहिजे. ती सर्जनशीलतेची वाट असते. सर्जनशीलता म्हणजे मनमानी नव्हे; आमच्या घराण्यात आहे तेच बरोबर, अशी भूमिकेमुळे शास्त्रीय संगीताच्या राग-रुपांमध्ये आज एकवाक्यता राहिलेली नाही. 
प्रत्येक घराण्यानुसार एखाद्या रागाच्या प्रस्तुतीला निदान सर्वांनी मान्यता तरी द्यावी. विरोध करणे, गोंधळ निर्माण करण्याचेच काम आज सुरु आहे. आपल्या ज्ञानाच्या पलीकडे संगीत शास्त्रात काही घडू शकते, हे त्यांना उमगतच नाही. निदान संगीतकलेच्या विकासासाठी त्यांनी एकत्र यायला हवे. मानकीकरणासाठी पाऊल उचलायला हवे. संगीत शास्त्राचा इतर कलांशी, विज्ञान-तंत्रज्ञानाशी जवळचा संबंध आहे. एकमेकांच्या मदतीनेच प्रत्येक कला पूर्णत्वाच्या ो, द्वेषाचे संबंध आणि संवाद असतात. स्वररेषांनी बनलेल्या लहान-मोठ्या आकृत्या, त्यांचे सौंदर्य, मोहक चाल, भावदर्शन या सा-यातून रागाची सुंदर मूर्ती आकार घेते. स्वत:च्या व्यक्तिमत्वाचेही ती निवेदन करत असते. या दृष्टीकोनातून रागसंगीत ऐकले, संगीताची भाषा शिकून घेतली तर आपण रागनिर्मितीच्या खूप जवळ जाऊ शकतो. एका व्यापक दृष्टीकोनातून प्रस्तुतीकरण आणि शास्त्राचा अभ्यास होणे, ही आजच्या काळाची गरज आहे. भारतीय संगीताने जागतिक मंचावर निर्माण केलेले स्थान बळकट करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलायला हवीत. पुढची पिढी या दृष्टीने विचार करेल, अशी आशा वाटते.
चित्रकाराच्या दृष्टीतून चित्र अदृश्य संगीत असते आणि संगीतकाराच्या दृष्टीतून संगीत हे अमूर्त चित्र असते. संगीत आणि चित्रकलेचा अत्यंत जवळचा संबंध आपण समजून घ्यायला हवा. संगीत शास्त्राचा इतर कलांशी, विज्ञान-तंत्रज्ञानाशी जवळचा संबंध आहे. एकमेकांच्या मदतीनेच प्रत्येक कला पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत असते. म्हणूनच, संगीताचा अभ्यास वेगवेगळया दृष्टीकोनातून होणे आवश्यक आहे. 

Web Title: Presentation of music and the relationship between scripture is like mirror image: Prabha Atre's special interview

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.