मुलांसाठी ‘पोलीसकाका योजना’, गुन्हेगारी कमी करण्याकरिता पोलिसांची विशेष योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 02:28 AM2018-12-24T02:28:22+5:302018-12-24T02:28:36+5:30

विद्यार्थ्यांकरिता पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी सुरु केलेल्या ‘पोलीसकाका’ ही योजनेची सुरु केली आहे. या योजनेची विस्तृत माहिती दिली.

Police plan for children, special scheme of police to reduce crime | मुलांसाठी ‘पोलीसकाका योजना’, गुन्हेगारी कमी करण्याकरिता पोलिसांची विशेष योजना

मुलांसाठी ‘पोलीसकाका योजना’, गुन्हेगारी कमी करण्याकरिता पोलिसांची विशेष योजना

googlenewsNext

सहकारनगर : विद्यार्थी वा विद्यार्थिनींना शालेय जीवनात काही अडचण निर्माण झाली पण त्यांना इतरांना ती अडचण सांगता येत नाही किंवा अडचण सांगण्यास संकोच वाटतो अशा विद्यार्थ्यांकरिता पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी सुरु केलेल्या ‘पोलीसकाका’ ही योजनेची सुरु केली आहे. या योजनेची विस्तृत माहिती दिली.
पुणे शहरातील गुन्हेगारी कमी करुन शहरात शांतता नांदावी याकरिता पुणे शहर पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांचे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालू आहेत. या अंतर्गत पूर्वी गुन्हे केलेल्या व न्यायालयातून जामिनावर बाहेर आलेल्या आरोपींवर वेळो वेळी नजर ठेवून त्यांच्या कारवाया, सध्या ते काय आहेत याचे मॉनिटरिंग पोलिसांच्या वतीने सुरू आहे. तसेच ज्या भागात गुन्हे वारंवार घडतात त्या भागात पोलिसांचे ‘व्हिज्युअल पोलिसींग’ सुरू असून, त्या अंतर्गत स्थानिक नागरिकांशी संपर्क साधून एखादी घटना घडण्यापूर्वी त्याची माहिती पोलिसांना द्यावी, यासाठी नागरिक गट तयार करुन त्यामध्ये पोलीस प्रतिनीधी काम करत आहे.
ज्या भागामध्ये शाळा आहे तेथील पोलीसकाकांची विद्यार्थ्यांना ओळख करुन दिली व त्यांचे मोबाईल नंबर दिले, तसेच शालेय मुलींना शाळेच्या बाहेर किंवा अंतर्गत भागात काही त्रास असल्यास त्यांनी नि:संकोचपणे महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे आपली तक्रार सांगावी, ज्यामध्ये स्कुल बसचालक, रस्त्यावरील टारगट मुले किंवा समाजातील इतर वाईट प्रवृत्तींकडून होणाºया त्रासाचा समावेश होतो.
गुन्हे जर कमी करायचे असतील तर त्यासाठी लहान वयातील मुलांकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांना त्या क्षेत्राकडे वळू नये याकरिता त्यांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे आणि प्रबोधनाकरिता शाळेपेक्षा दुसरी योग्य जागा मिळणे अशक्य आहे.
याच संधीचा उपयोग करण्याचे दत्तवाडी पोलिसांनी ठरविले. त्यानुसार सध्या शालेय विश्वामध्ये स्नेहसंमेलनाचे वारे मोठ्या प्रमाणात वाहू लागलेले आहे.
या स्नेहसंमेलनामध्ये आपल्या मुलांचे कलागुणांचे कौतुक करण्यासाठी पालकसुद्धा आवर्जून वेळ काढून उपस्थित राहतात.
याचे औचित्य साधून मुलांमध्ये आणि पालकांमध्ये प्रबोधन करण्यासाठी रावसाहेब पटवर्धन हायस्कुल सिंहगड रोड व अरण्येश्वर इंग्लिश मेडीयम स्कुल सहकार नगर या शाळेमध्ये स्नेह संमेलनाच्या वेळेत दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, पो.नि. गुन्हे कृष्णा इंदलकर, पोलीस उप निरीक्षक विकास जाधव, रुपाली कुलथे, सहा. पोलीस फौजदार रमेश मुजुमले, पोलीस हवालदार श्रीकांत शिरोळे, प्रवीण जगताप, साधना ताम्हाणे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल साळुंखे, रोहन खैरे यांनी उपस्थित राहून विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला
विद्यार्थ्यांना शाळेमध्ये घेऊन येणारी व घरी नेऊन सोडणारी स्कुल बस किंवा रिक्षा यामध्ये किती विद्यार्थी असावेत, लहान मुलांना दुचाकी चालविण्याचे लायसन्स नसते.

काही पालक अतिप्रेमापोटी मुलांना वाहन चालवायला देतात. त्यांनी आपल्या मुलाच्या जीविताचे भवितव्य ओळखून दुचाकी लायसन्स नसताना देऊ नये. दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे किती आवश्यक आहे याचे उदाहरणासह विश्लेषण या कार्यक्रमात केले. रावसाहेब पटवर्धन हायस्कूलचे वर्षा गुप्ते, शिवाजी खांडेकर, मुख्याध्यापिका हजारे, अरण्येश्वर इंग्लिश मीडियम स्कूलचे बाळासाहेब ढुमे यांनी विशेष सहकार्य केले व पोलीस राबवत असलेल्या कम्युनिटी पोलिसिंग या संकल्पनेचे स्वागत केले.

Web Title: Police plan for children, special scheme of police to reduce crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.