पोलीस बांधवांना राख्या बांधून रक्षणाचे साकडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 11:29 PM2018-08-26T23:29:28+5:302018-08-26T23:29:43+5:30
कोरेगावा भीमा : दंगलीनंतर आठ महिन्यांपासून बंदोबस्त
कोरेगाव भीमा : १ जानेवारीपासून कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे बंदोबस्तावर असलेल्या राज्य राखीव दलाच्या पोलीस बांधवांना सामाजिक बांधिलकीतून गावातील विद्यार्थिनी व महिला भगिनींनी राख्या बांधून रक्षणाचे साकडे घालत अनोखा असा रक्षाबंधनाचा सण साजरा केला.
आज रक्षाबंधनानिमित्त विद्यार्थिनी, महिला भगिनी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद व इतर पदाधिकारी तसेच जनकल्याण ट्रस्टचे अध्यक्ष सुरेशकुमार सिंग व इतर पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत या रक्षाबंधनाचे आयोजन केले.
यात गावात बंदोबस्तावर असलेल्या राज्य पोलीस दलाच्या प्लॅटूनमधील सर्व पोलीस बांधवांना राख्या बांधल्या. या विद्यार्थिनींना व महिलांना शिवसेना व जनकल्याण ट्रस्टच्या वतीने पेन तसेच नोटपॅड भेट देण्यात आले.
यावेळी केशवराव फडतरे, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, शिरीष देशमुख, भानुदास सरडे, सुरेशकुमार सिंह, शैलेन्द्र कुमार सिंह, सुरेन्द्र उपाध्याय, चन्द्रभूषण कुँवर, राजेन्द्र सिंह, राजबहादुर चौबे आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
बंदोबस्तात नवीन बहिणी मिळाल्या
१ जानेवारी पासून उन, पावसाची तमा न बाळगता कोरेगाव भीमा येथे बंदोबस्तावर असल्याने कोणत्याही सन, धार्मिक कायार्साठी गावी जाता आले नाही. आज रक्षाबंधन असूनही राखी बांधण्यासाठी बहिणीकडे जाता आले नाही. मात्र येथेच अनेक भगिनींनी राख्या बांधल्याने रक्षाबंधनाचा सण खºया अर्थाने साजरा झाल्याची भावना या प्लॅटूनचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक दिलीप वरखडे व इतर पोलीस बांधवांनी व्यक्त केल्या.