Video : भाईचा बड्डे खतरनाक ..... पण थेट जेलमध्ये 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 11:16 AM2019-02-27T11:16:29+5:302019-02-27T13:49:13+5:30

विश्रांतवाडी पोलिसांनी वाढदिवसाचा केक तलवारीने कापणाऱ्या दोन भाईंना तलवारीसह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. या भाईंना न्यायालयाने अशा वाढदिवसाची भेट म्हणून थेट कारागृहात रवानगी केली. 

Police arrested the two brothers, who cut the birthday cake with the sword | Video : भाईचा बड्डे खतरनाक ..... पण थेट जेलमध्ये 

Video : भाईचा बड्डे खतरनाक ..... पण थेट जेलमध्ये 

Next
ठळक मुद्देविश्रांतवाडी पोलिसांनी वाढदिवसाची केक तलवारीने कापणाऱ्या दोन भाईंना तलवारीसह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. भाईंना न्यायालयाने अशा वाढदिवसाची भेट म्हणून थेट कारागृहात रवानगी केली. विश्रांतवाडी पोलिसांनी या प्रकरणी दोघांना बेकायदेशीर घातक शस्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. 

विमाननगर  - ऐरवी अनेक भाई मोठ्या दिमाखात वाजतगाजत आपले वाढदिवस साजरे करतात.परिसरात आपली दहशत रहावी किंबहुना मार्केटमधील आपलं वजन दहशत दाखवण्यासाठी भाई राडा घालतात. बऱ्याचदा याबद्दल स्थानिक तक्रार करायला धजावत नाहीत. पोलीस देखील भाईच्या या पॅटर्नकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात. आणि त्यातूनच भाईच्या गुन्हेगारीला खतपाणी मिळते. आता तर भाईच्या वाढदिवसात उघड उघड तलवारी आणल्या जात आहेत. एवढंच नाही तर त्याचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करायला देखील हे महाभाग कमी करत नाहीत. 

विश्रांतवाडी पोलिसांनी  वाढदिवसाचा केक तलवारीने कापणाऱ्या दोन भाईंना तलवारीसह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. या भाईंना न्यायालयाने अशा वाढदिवसाची भेट म्हणून थेट कारागृहात रवानगी केली. 

रोहित दिपक ठोंबरे (वय 21, मुंजाबावस्ती धानोरी) व नितेश बाबासाहेब सरोदे (वय 19,बर्मासेल लोहगाव) या  दोघांना पेट्रोलिंग दरम्यान विश्रांतवाडी पोलिसांनी तलवारीसह ताब्यात घेतले. अधिक तपासात नितेश याने रोहित याच्या वाढदिवसासाठी तलवार आणून याच तलवारीने केक कापून त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. विश्रांतवाडी पोलिसांनी या प्रकरणी दोघांना बेकायदेशीर घातक शस्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. 

पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रमुख उपनिरीक्षक अभिजीत चौगुले,पोलिस हवालदार प्रवीण राजपूत, कर्मचारी यशवंत किर्वे,विनायक रामाने, प्रवीण भालचिम, वामन सावंत,रिहान पठाण,प्र फुल्ल मोरे, शेखर खराडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Web Title: Police arrested the two brothers, who cut the birthday cake with the sword

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.