पिंपरी महापालिका विरोधीपक्षनेते योगेश बहल यांचा राजीनामा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 19:43 IST2018-05-05T19:43:10+5:302018-05-05T19:43:10+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ता गेल्यानंतर पहिल्यांदाच विरोधी पक्षात बसलेल्या राष्ट्रवादीने माजी महापौर बहल यांच्याकडे विरोधीपक्षनेतेपदाची धुरा सोपविली होती.

Pimpri municipal opposition leader Yogesh Bahall resigns | पिंपरी महापालिका विरोधीपक्षनेते योगेश बहल यांचा राजीनामा 

पिंपरी महापालिका विरोधीपक्षनेते योगेश बहल यांचा राजीनामा 

ठळक मुद्देवर्षभरात बहल यांची कारकीर्द चमकदार

पिंपरी : महापालिकेचे विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी (शनिवारी) पदाचा राजीनामा दिला आहे. महापौर नितीन काळजे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ता गेल्यानंतर पहिल्यांदाच विरोधी पक्षात बसलेल्या राष्ट्रवादीने माजी महापौर बहल यांच्याकडे विरोधीपक्षनेतेपदाची धुरा सोपविली होती. १७ मार्च २०१७ रोजी विरोधी पक्षनेतेपदी बसलेल्या बहल यांना सुरवातीला कार्यालयासाठी झगडावे लागले होते. वर्षभरात त्यांची कारकीर्द चमकदार राहिली. बहल यांचा विरोधीपक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. बहल यांच्यानंतर राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींकडून विरोधीपक्षनेतेपदाची जबाबदारी कुणाकडे दिली जातात याबाबत पक्षासह राजकीय वर्तुळात देखील उत्सुकता आहे. 

Web Title: Pimpri municipal opposition leader Yogesh Bahall resigns