ओडिशात नागरिकांना सुरक्षित हलविले, मराठी अधिकाऱ्यांमुळे महाराष्ट्राची मान उंचावली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 04:31 AM2019-05-05T04:31:09+5:302019-05-05T04:31:26+5:30

ओडिशात हवामान खात्याचा इशारा अत्यंत गांभीर्याने घेतला जातो. कुठल्याही वादळाची शक्यता वर्तवण्यात आली तरी आमची टीम सज्ज होते. याकरिता आधीच प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाते. यापूर्वी 'तितली' , फायलिन' सारख्या वादळांचा अनुभव असल्याने नागरिक अधिक सजग झाले आहेत. - विजय कुलंगे, जिल्हाधिकारी, गंजाम, ओडिशा

In Odisha the citizens were moved safely, due to Marathi officials, the importance of Maharashtra increased | ओडिशात नागरिकांना सुरक्षित हलविले, मराठी अधिकाऱ्यांमुळे महाराष्ट्राची मान उंचावली

ओडिशात नागरिकांना सुरक्षित हलविले, मराठी अधिकाऱ्यांमुळे महाराष्ट्राची मान उंचावली

Next

- नेहा सराफ
फोनी चक्रीवादळाने ओडिशात धुमाकूळ घालून जनतेचे जीवन विस्कळीत केले. हजारो घरांचे नुकसान झाले अन् नागरिकांचा आसराच काढून घेतला. या फोनीच्या फटक्यातही ओडिशामध्ये एका मराठमोठ्या जिल्हाधिकाºयाने केलेल्या कामामुळे लाखो नागरिकांना दिलासा मिळाला आहे. फोनीच्या वादळी संकटावर विजय कुलंगे यांनी सर्वाधिक नुकसान झालेल्या गंजाम जिल्ह्यात तत्परतेने तीन लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले. महाराष्ट्रातील अहमदनगरचे सुपुत्र असलेल्या जिल्हाधिकारी विजय कुलंगे यांच्याशी साधलेला हा संवाद.
प्रश्न : फोनीच्या संकटानंतर खबरदारीच्या काय उपाययोजना केल्या?
- गंजाम जिल्ह्यात अवघ्या ३६ तासांमध्ये जिल्हा प्रशासनाने तीन लाख लोकांचे स्थलांतर केले. या नियोजनामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकही जीवितहानीची घटना घडली नाही. इतकेच नव्हे तर वादळ संपल्यावर अवघ्या दोन तासात या जिल्ह्यातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करण्यात आले. ओडिशामध्ये अनेक मराठी अधिकारी काम करत असल्यामुळे महाराष्ट्राची मान उंचावली आहे.
प्रश्न : स्थलांतर करताना काय खबरदारी घ्यावी लागली ?
- बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले फोनी हे चक्रीवादळ शुक्रवारी
ओडिशा किनारपट्टीला धडकले. त्यानंतर ओडिशा प्रशासनाला सूचना देऊन तत्परतेने कामाला सुरवात केली. प्रशासनानेही नियोजन आणि तात्काळ अंमलबजावणीच्या प्रक्रियेची आखणी अत्यंत काळजीपूर्वक केली. गंजाम जिल्ह्यात ५ तालुके वादळामुळे प्रभावित झाले होते.
प्रश्न : हवामान खात्याच्या इशाºयाचा काय फायदा झाला?
- फोनीबाबत हवामान खात्याने पाच दिवस आधी प्रशासनाला या विषयी कळवले होते. त्यानुसार गंजाममधून नियोजन करून शेवटच्या दीड दिवसांत तीन लाख नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर केले गेले. यातही प्राधान्याने गरोदर महिला, अपंग, वयोवृद्ध यांना हलविण्यात आले. यावेळी ५४० गरोदर महिलांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. यातील १५३ महिलांची तीन तारखेला प्रसुतीही झाली. प्रत्येक स्थलांतर स्थळी अन्न, पाणी, जनरेटर आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवली होती.

वादळात जिल्ह्याधिकारी रस्त्यावर
प्रत्यक्षात हे वादळ जिल्ह्यात आल्यावर दुलंगे यांनी जीवाची पर्वा न करता थेट किनारपट्टीनजीकच्या महामार्गावर धाव घेतली. रस्त्यावर काही अडचण निर्माण झाल्यास लवकर पोहोचता यावे यासाठी दोन कॉडलेस फोन, चार ते पाच वेगवेगळे सीम कार्डचे मोबाईल आणि चार कर्मचाऱ्यांसह त्यांनी रस्त्यावर फिरणे पसंत केले. त्यांच्या या साहसाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

अशी राबविली
आपत्कालीन
यंत्रणा
अन्न, पाणी, जनरेटर आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवली होती. स्थानिक भागातील केटरर्स सेवा देणाºया व्यक्तींशी संपर्क करण्यात आला होता. अनेक नागरिक आपली जनावरे किंवा पाळीव प्राणी सोबत घेऊन येत असल्याने त्यांनाही दाखल करून घेण्यात आले. या काळात सर्व माध्यमांचा आधार घेऊन कच्च्या घरातून बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले. शिवाय प्रत्यक्ष वादळाला सुरुवात झाल्यावर कोणीही बाहेर पडू नये असाही प्रचार करण्यात आला.

Web Title: In Odisha the citizens were moved safely, due to Marathi officials, the importance of Maharashtra increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.