पुढील वर्षी ब्लॉक स्तरावरील हवामान अंदाज, प्रत्युष या उच्च क्षमतेच्या सुपर कॉम्प्युटरचे लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2018 08:12 PM2018-01-08T20:12:27+5:302018-01-08T20:12:34+5:30

राष्ट्रीय मान्सून मिशनअंतर्गत देशात प्रत्येक १२ किलोमीटर परिसरातील हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

The next year, the block level weather forecast, the launch of Supercomputer Supercomputer | पुढील वर्षी ब्लॉक स्तरावरील हवामान अंदाज, प्रत्युष या उच्च क्षमतेच्या सुपर कॉम्प्युटरचे लोकार्पण

पुढील वर्षी ब्लॉक स्तरावरील हवामान अंदाज, प्रत्युष या उच्च क्षमतेच्या सुपर कॉम्प्युटरचे लोकार्पण

Next

पुणे : राष्ट्रीय मान्सून मिशनअंतर्गत देशात प्रत्येक १२ किलोमीटर परिसरातील हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या जिल्हा व काही तालुका स्तरावर ही यंत्रणा आहे. पुढील वर्षीपासून प्रत्येक ब्लॉकचा अंदाज वर्तविला जाईल. त्यानुसार तयारी सुरू असल्याची माहिती केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.

पाषाण येथील इंडियन इन्स्टिट्युट आॅफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (आयआयटीएम) मध्ये कार्यान्वित करण्यात आलेल्या प्रत्युष या उच्च क्षमतेच्या सुपर कॉम्प्युटरच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार अनिल शिरोळे, केंद्रीय भू विज्ञान विभागाचे सचिव एम. राजीवन, सह सचिव डॉ. विपिन चंद्र, आयआयटीएमचे संचालक प्रा. रवी एस. नंजुनदिहा, हाय परफॉर्मन्स काम्प्युटिंग (एचपीसी)चे प्रकल्प संचालक डॉ. ए. सूर्यचंद्र राव उपस्थित होते.

डॉ. हर्षवर्धन म्हणाले, प्रत्युषचे लोकार्पण ही संपूर्ण देशवासीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे. एचपीसी प्रणालीअंतर्गत आतापर्यंत भारतात सुपर कॉम्प्युटरची क्षमता १ पेटाफ्लॉपपर्यंत होती. आयआयटीएममधील कॉम्प्युटरची क्षमता ४ पेटाफ्लॉप असून, नोएडा येथील संस्थेत पुढील आठवड्यात २.८ पेटाफ्लॉप क्षमतेचा संगणक विकसित करण्यात आला आहे. त्यामुळे हवामानाच्या क्षेत्रात होत असलेल्या विविध संशोधनाचा वेग वाढणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात भारत चौथ्या स्थानी पोहोचणार आहे. त्यामुळे हवामान, त्सुनामी, वादळ, भूकंप यांसह विविध नैसर्गिक आपत्तींचा अधिक अचूक अंदाज वर्तविणे शक्य होणार आहे.

या संगणकासाठी ४५० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. राष्ट्रीय मान्सून मिशनअंतर्गत सध्या विविध प्रकल्पांवर काम सुरू आहे. त्यामुळे पुढील काही वर्षात नैसर्गिक आपत्तींबाबत अधिक अचूकता येणार आहे. विभागामार्फत सध्या देशभरातील २ कोटी ४० लाख शेतक-यांपर्यंत हवामानविषयक माहिती थेट मोबाईलवर दिली जात आहे. २०१९ पर्यंत ४ कोटी ५० लाख शेतक-यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे. तर भविष्यात ९ कोटी ३० लाख मिलियन शेतक-यांचे ध्येय निश्चित करण्यात आल्याचे हर्षवर्धन यांनी सांगितले.
दरम्यान, प्रत्युषमुळे अधिक खोलवर आणि वेगाने संशोधन करणे, हवामानाचा अचूक अंदाज वर्तविणे शक्य होणार आहे. तसेच हवामान आणि जलवायू क्षेत्रामध्ये काम करणा-या अन्य संशोधन संस्थांनाही त्याचा मोठा फायदा होणार आहे.
------------------------
निधीची कमतरता नाही
विज्ञान व तंत्रज्ञान विभाग तसेच संशोधनाला कमी निधी मिळत असल्याची ओरड चुकीची असून केंद्र सरकार सुरूवातीपासून याबाबतीत सकारात्मक असल्याचे डॉ. हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले. देशातील संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने कोट्यावधी रुपये दिले आहेत. तसेच सर्व संशोधन संस्थामध्येही आता चांगला समन्वय होत असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: The next year, the block level weather forecast, the launch of Supercomputer Supercomputer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.