माझं घर भरलेलं आहे, तुम्ही तुमचं अगाेदर पाहा ; पवारांचा माेदींना टाेला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 02:41 PM2019-04-07T14:41:43+5:302019-04-07T14:44:32+5:30

माझं घर भरलेले आहे तुमचं घर आगोदर पाहा असा टोला माजी केंद्रीय कृषीमंञी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.

my home is full of people, you see at yours ; pawar to modi | माझं घर भरलेलं आहे, तुम्ही तुमचं अगाेदर पाहा ; पवारांचा माेदींना टाेला

माझं घर भरलेलं आहे, तुम्ही तुमचं अगाेदर पाहा ; पवारांचा माेदींना टाेला

Next

दौंड : माझं घर भरलेले आहे तुमचं घर आगोदर पाहा असा टोला माजी केंद्रीय कृषीमंञी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. पाटस ( ता. दौंड ) येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत पवार बोलत होते. 

पवार म्हणाले, माझं बोट धरुन राजकारणात येणाऱ्या मोदींनी वर्ध्याच्या सभेत माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर टीका केली. पवार कुटुंबात भांडणे आहेत, असे मोदी म्हणाले.  राजकारणात  वैयक्तिक टीका करु नये हा राजकारणाचा नियम आहे. मला दिल्लीत मोदी भेटल्यावर त्यांना मी विचारेल की माझ्या घरात भांडणे आहेत, हे तुम्हाला कसे कळले. माझं घर भरलेल आहे तुमचं घर कस आहे असही मी त्यांना विचारेल. राजकारणात संघर्ष असावा परंतु वैयक्तिक संघर्ष  नसावा. राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळाचे निवारण करण्यासाठी नियोजन करणे काळाची गरज आहे. निवडणुका येतील आणि जातील माञ दुष्काळात जनता होरपळता कामा नये. केंद्र  आणि राज्यातील भाजपा आणि मिञ पक्ष सरकार भुलथापाचे सरकार ठरले. बारामतीत फडणवीस यांनी सांगीतले की राज्यात भाजपा सरकार आल्यास पहिल्याच मंञीमंडळात धनगर  समाजाला आरक्षण देऊ, परंतु अद्याप या सरकारने आरक्षण दिले नाही. शेतकरी भरडतोय महागाई वाढली तेव्हा भविष्यात फसव्या विचाराचे प्रतिनिधी केंद्रात आणि राज्यात जाता कामा नही असे शेवटी पवार म्हणाले. 

ते पैसे निवडणुकीत बाहेर निघतील
भीमा पाटस  कारखान्याच्या  कामगारांनी गेले काही महीन्यांपासून पगार नाही अशी तक्रार  मांडली. यावर शरद पवार म्हणाले की कामगारांना , शेतकऱ्यांना पैसा नाही , मग मुख्यमंञ्यांनी भीमा पाटसला काही कोटी रुपयांची मदत केली. ती मदत गेली कुठे कदाचीत मुख्यमंञ्यांनी दिलेले कोट्यावधी रुपये आता निवडणुकीत  बाहेर निघतील असे पवार म्हणताच एकच हास्यकल्लोळ झाला.

Web Title: my home is full of people, you see at yours ; pawar to modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.