पुण्यात टाेळक्यांचा धुडगूस ; अाठ चारचाकी एका रिक्षाची ताेडफाेड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 18:03 IST2018-11-04T17:51:44+5:302018-11-04T18:03:49+5:30

पुण्यात टाेळक्यांचा धुडगूस सुरु असून ससाणे नगर येथील एका साेसायटीतील वाहनांची ताेडफाेड करण्यात अाली अाहे.

mob trash cars in hadapsar | पुण्यात टाेळक्यांचा धुडगूस ; अाठ चारचाकी एका रिक्षाची ताेडफाेड

पुण्यात टाेळक्यांचा धुडगूस ; अाठ चारचाकी एका रिक्षाची ताेडफाेड

पुणे : पुण्यात टाेळक्यांचा धुडगूस अजूनही सुरु असून शनिवारी रात्री दाेन टाेळक्यांमध्ये झालेल्या भांडणामध्ये हडपसर मधील ससाणे नगर येथील अमित हाईट्स साेसाटीतील वाहनांची ताेडफाेड करण्यात अाली. याप्रकरणी अज्ञात टाेळक्यांवर गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. 

    हडपसर येथील ससाणे नगर भागात दाेन टाेळक्यांमध्ये रात्री अकराच्या सुमारास भांडणे झाली. या भांडणांमध्ये टाेळक्यांकडून अमित हाईट्स साेसायटीच्या सभासदांच्या अाठ चारचाकी तर एका रिक्षाची ताेडफाेड केली. या प्रकरणी पाेलिसांनी गुन्हा दाखल केला अाहे. दरम्यान पाेलिसांना या घटनेचे सीसीटिव्ही फुटेज मिळाले असून त्या अाधारे अाराेपींचा शाेध घेण्यात येत अाहे. तसेच या प्रकरणी दाेन संशयितांना पाेलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चाैकशी करण्यात येत अाहे.

Web Title: mob trash cars in hadapsar