Makar Sankranti 2018 : पुण्यात रंगणार पतंग महोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2018 09:42 PM2018-01-13T21:42:51+5:302018-01-13T21:47:45+5:30

मकर संक्रांतीच्या दिवसाची वाट खरंतर पतंगबाजीची मौज लुटण्यासाठी सर्वाधिक पाहिली जाते. पतंग उडवण्यापेक्षा पेंच लढवण्याचे मजा काही औरच असते.

Makar Sankranti 2018: Kite festival in Pune | Makar Sankranti 2018 : पुण्यात रंगणार पतंग महोत्सव

Makar Sankranti 2018 : पुण्यात रंगणार पतंग महोत्सव

googlenewsNext

पुणे - मकर संक्रांतीच्या दिवसाची वाट खरंतर पतंगबाजीची मौज लुटण्यासाठी सर्वाधिक पाहिली जाते. पतंग उडवण्यापेक्षा पेंच लढवण्याचे मजा काही औरच असते. यानिमित्त शौकिनांसाठी देशभरात ठिकठिकाणी पतंग महोत्सवाचंही आयोजन करण्यात येते.   पुण्यातील 14 जानेवारीला पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील हिंजवाडी भागातील कुसगावातील रेन्बो आयलँड येथे पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कासारसाई धरणाजवळ या महात्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 
रविवारी सकाळी 10 ते दुपारी 3.30 पर्यंत हा महोत्सव असणार आहे. तुम्हाला या महोत्सवात सहभागी व्हायचे असल्यास 600 रुपये एन्ट्री फी भरावी लागणार आहे. 

पतंग- लाडूंची ऑनलाइन खरेदी
होलसेल बाजारात उपलब्ध असणाऱ्या पतंग आणि फिरक्यांपेक्षा ऑनलाइन वेबसाईटसवर त्यांच्या किमती अधिक आहेत. त्यातच फेस्टिव्ह पॅकच्या नावाखाली एकाचवेळी 400 ते 600 पतंग काही साईटवर खरेदी कराव्या लागत आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला काही कात्री लागण्याची शक्यता आहे. पतंगदोरी, डी कॅथलॉन, अमेझॉन, हायफाय काईट्स या साईटसवर जणू पतंगमहोत्सवच भरला आहे.

दिवाळीत विविध पदार्थांची ऑनलाइन शॉपिंग होणे स्वाभाविक असतानाच मकर संक्रांतीसाठी तिळाचे लाडू आणि तिळाच्या कड्या ऑनलाइन शॉपिंग साईटसवर उपलब्ध आहेत.  

या ठिकाणी अशी साजरी केली जाते मकर संक्रांत 

गुजरातमधलं उत्तरायण
गुजरातमध्ये उत्तरायण म्हणजे मकरसंक्रांत धूमधडाक्यात साजरा केला जातो. मकरसंक्रांतीच्या दिवशी गुजरातमध्ये विविधरंगी आणि मोठंमोठी पतंग उडवली जातात. या पतंगबाजीत अनेकांच्या पतंग उडवण्याच्या कौशल्याचा कस लागतो. उत्तरायणाच्या दिवशी रंगीबेरंगी पतंगांनी आकाश झळाळून निघते. गुजरातमध्ये पतंग उडवण्याची परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. अनेक जण रस्त्यावर उतरूनही मकरसंक्रांतीचा जल्लोष करतात. उष्णता असह्य होत असल्यानं गुजरातमध्ये पहाटे 5 वाजल्यापासून पतंग उडवण्यास सुरुवात होते. या सण भगवान सूर्याला समर्पित असतो. अनेक जण गंगेच्या पवित्र पाण्यात आंघोळही करतात. असं म्हणतात, सूर्य मकरसंक्रांतीच्या दिवशीच पुत्र शनिदेव याची भेट घेऊन दोघांमधील वाद संपुष्टात आणतात. सहा महिन्यांनी मकरसंक्रांतीच्या दिवशीच स्वर्गाचे दरवाजे उघडले जातात, अशीही आख्यायिका सांगितली जाते. गुजरातमध्ये अनेकांच्या घरात संक्रांतीच्या दिवशी उंधियो हा पदार्थ बनवला जातो. तसेच अनेकांच्या घरात जिलेबीची मेजवाणी असते.

पंजाबमधील माघी
पंजाबमध्ये मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला 'लोहारी' हा सण जल्लोषात साजरा केला जातो. पंजाब या भागात 13 जानेवारी या दिवशी लोहारी सण साजरा केला जातो. रब्बी पिकांच्या कापणीशी हा सण संबंधित असतो. संध्याकाळच्या शेकोटीसाठी छोटी मुले घरोघरी जाऊन गाणी म्हणतात, शेकोटीसाठी लाकडे वा पैसे गोळा करतात. हिवाळ्यातील हा सर्वात थंड दिवस असतो. या दिवशी लोहारीच्या देवीची पूजा केले जाते. लाहोरीच्या दुस-याच दिवशी माघी मकरसंक्रांत साजरा केला जातो. पंजाबमधील शेतक-यांसाठी हा आर्थिक भरभराटीचा दिवस समजला जातो. पंजाबमध्ये लाहोरीपासूनच पतंगोत्सवाला सुरुवात होते.  

तामिळनाडूमधील पोंगल
मकरसंक्रांत हा सण तामिळनाडूमध्ये पोंगल म्हणून साजरा केला जातो. त्यालाच भोगी पोंगल असंही संबोधलं जातं. या दिवशी घरातल्या पुरातन वस्तू काढून घरात साफसफाई केली जाते. त्याप्रमाणेच नव्या वस्तूही घेतल्या जातात. तामिळनाडूमध्ये पोंगल हा सण तीन दिवस साजरा केला जातो. भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची पद्धत आहे. ते म्हणजे मुगाची डाळ व तांदूळ घालून केलेली खिचडी, बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी व लोणी, पावटे-गाजर- हरभरे- वांगी या सर्वांची मिळून भाजी करतात. या भाजीसोबत बाजरीची भाकरी देखील खावी. बाजरी उष्ण असल्याने ती हिवाळ्यात खाणे फायदेशीर असते.

पश्चिम बंगालमधला पौष पर्व
पश्चिम बंगालमध्येही मकरसंक्रांत हा मोठ्या थाटात साजरा केला जातो. पश्चिम बंगालमध्ये पौष पर्व या नावानं तो साजरा होतो. रब्बी पिकांची कापणी केल्यानंतर पौष पर्वाला सुरुवात होते. पश्चिम बंगालमध्ये गोडधोड खाऊन बंगाली लोक पौष पर्वाचा आनंद एकमेकांसोबत द्विगुणित करतात. या सणानिमित्त भात, नारळ आणि दुधाचं मिश्रणं असलेला पिठा हा पदार्थही बनवला जातो. या सणानिमित्त भाविक गंगा किनारी जाऊन पूजा-अर्चाही करतात. 
 

Web Title: Makar Sankranti 2018: Kite festival in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.