महाराष्ट्र साहित्य परिषद : अभिजातसाठी दिल्लीत आवाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 03:23 AM2018-01-28T03:23:25+5:302018-01-28T03:25:40+5:30

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याकरिता केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने थेट दिल्लीच गाठली. या मागणीची दखल घेण्यासाठी परिषदेच्या सदस्यांनी धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे शिवछत्रपतींच्या पुतळ्यासमोर प्रार्थना करून सर्वांनी ‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

Maharashtra Sahitya Parishad: Voice for the Classics in Delhi | महाराष्ट्र साहित्य परिषद : अभिजातसाठी दिल्लीत आवाज

महाराष्ट्र साहित्य परिषद : अभिजातसाठी दिल्लीत आवाज

Next

पुणे : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याकरिता केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने थेट दिल्लीच गाठली. या मागणीची दखल घेण्यासाठी परिषदेच्या सदस्यांनी धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे शिवछत्रपतींच्या पुतळ्यासमोर प्रार्थना करून सर्वांनी ‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, साताºयाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मसाप सातारा जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी, रवींद्र बेडकिहाळ, पुणे जिल्हा प्रतिनिधी राजन लाखे, लेखक राजेंद्र माने, डॉ. उमेश करंबळेकर यांच्यासह
अनेक मराठीप्रेमी या वेळी उपस्थित होते.
प्रा. जोशी म्हणाले, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठीच्या सर्व तांत्रिक आणि कायदेशीर बाबींची पूर्तता झालेली असतानाही देशातील सहा भाषांना अभिजातचा दर्जा देणारे केंद्र सरकार मराठीला हा दर्जा देण्यासाठी मात्र चालढकल करत आहे. हा विषय मार्गी लागावा यासाठी साहित्य परिषदेने लोकचळवळ सुरू केली. पंतप्रधान कार्यालयाला एक लाखाहून अधिक पत्रे पाठवली. सातत्याने पत्रव्यवहार केला. मात्र, राजकीय इच्छाशक्ती कमी पडल्यामुळे ते होऊ शकले नाही. अभिजात दर्जासाठी आता केवळ केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीची आवश्यकता आहे. मराठीला अभिजातचा दर्जा मिळणे हा मराठी अस्मितेचा विषय आहे. २७ फेब्रुवारीपूर्वी (मराठी भाषा दिनापूर्वी) अभिजातचा निर्णय जाहीर न केल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल. शिवेंद्रसिंहराजे यांनीही याप्रश्नावर सर्व राजकीय पक्षांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून या विषयासाठी एकत्र येणे जरुरीचे असल्याचे सांगितले.

प्रकाश जावडेकर यांनी पुढाकार घ्यावा
दिल्लीत साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना अभिजातचा विषय मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. त्याला जावडेकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

Web Title: Maharashtra Sahitya Parishad: Voice for the Classics in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.