चापेकरांवर लवकरच टपाल तिकीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 06:49 IST2017-07-26T06:49:22+5:302017-07-26T06:49:24+5:30

मावळ लोकसभा मतदार संघाच्या प्रश्नाबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली. त्या वेळी त्यांना संतश्रेष्ठ तुकोबारायांची गाथा भेट दिली.

Krantiveer Chapekar's Postal Ticket launch | चापेकरांवर लवकरच टपाल तिकीट

चापेकरांवर लवकरच टपाल तिकीट

पिंपरी : मावळ लोकसभा मतदार संघाच्या प्रश्नाबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली. त्या वेळी त्यांना संतश्रेष्ठ तुकोबारायांची गाथा भेट दिली. तसेच भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाºया क्रांतिवीर चापेकरांच्या डाक तिकीट प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यासाठी विनंती केली.
मावळ मतदार संघातील प्रलंबित प्रश्नांसाठी खासदार बारणे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली. त्याचबरोबर पिंपरीतील हिंदुस्थान अ‍ॅण्टिबायोटिक्स कंपनीच्या (एचए) कामगारांचे वेतन देण्यासाठी केंद्र सरकारकडून १०० कोटी दिल्याबद्दल पंतप्रधानांचे आभारही व्यक्त केले. त्याचबरोबर पनवेल येथे होणारे नवीन विमानतळ उरण येथील जेएनपीटीचा विस्तार तसेच रेल्वे आणि संरक्षण विभागाशी निगडित प्रश्नाबाबत चर्चा केली. अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले. पिंपरी-चिंचवड शहरातील क्रांतिवीर चापेकर बंधूनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान दिले. क्रांतिवीर चापेकरांच्या नावाने लवकरच डाक तिकीट तयार होणार आहे. तिकीट अनावरणासाठी पंतप्रधानांनी उपस्थित रहावे, अशी त्यांनी विनंती केली.

Web Title: Krantiveer Chapekar's Postal Ticket launch