सराफाच्या घरातून 42 लाख 82 हजार किंमतीचे दागिने लांबविले; धनकवडीमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 01:41 PM2017-09-12T13:41:54+5:302017-09-12T13:41:54+5:30

परगावी गेलेल्या सराफाचे घर फोडून तब्बल ४७ लाख ८२ हजार ५०० रुपये किंमतीचे १ किलो ९१३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळविल्याची घटना घडली आहे.

Jewelery worth 42 lakh 82 thousand worth of jewelery was removed from the house of bullion; The incident in Dhankawadi | सराफाच्या घरातून 42 लाख 82 हजार किंमतीचे दागिने लांबविले; धनकवडीमधील घटना

सराफाच्या घरातून 42 लाख 82 हजार किंमतीचे दागिने लांबविले; धनकवडीमधील घटना

Next
ठळक मुद्देपरगावी गेलेल्या सराफाचे घर फोडून तब्बल ४७ लाख ८२ हजार ५०० रुपये किंमतीचे १ किलो ९१३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळविल्याची घटना घडली आहे. अशोक यशवंत महाडिक (वय ६५, रा. विरंगुळा इमारत, जगदीश हौसिंग सोसायटी, धनकवडी) यांनी सहकार नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे, दि. 12- परगावी गेलेल्या सराफाचे घर फोडून तब्बल ४७ लाख ८२ हजार ५०० रुपये किंमतीचे १ किलो ९१३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार धनकवडी येथे उघडकीस आला आहे. 

अशोक यशवंत महाडिक (वय ६५, रा. विरंगुळा इमारत, जगदीश हौसिंग सोसायटी, धनकवडी) यांनी सहकार नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महाडिक हे ८ ते ११ सप्टेंबर दरम्यान मुंबईला नातेवाईकांकडे गेले होते. त्यांचं सराफाचं दुकान आहे. अशोक महाडिक यांनी दुकानातून काही दागिने घरी आणून ठेवले होते. चोरट्यांनी कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. तिजोरी फोडून महाडिक यांच्या पत्नीचे, आईचे आणि सूनेचे, तसेच दुकानातील दागिने घेऊन पोबारा केला. महाडिक कुटुंबिय सोमवारी (दि. ११) सकाळी दहाच्या सुमारास घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. घटनास्थळाची गुन्हे शाखा, श्वान पथक आणि प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. सहकारनगर पोलिस ठाण्यातील गुन्हे शाखेचे निरीक्षक ए. टी. वाघमळे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Jewelery worth 42 lakh 82 thousand worth of jewelery was removed from the house of bullion; The incident in Dhankawadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :theftचोरी