पुण्यात शेकडो झाडे जमीनदोस्त, परतीचा पाऊस झाडांच्या ‘मुळावर’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 02:35 AM2018-10-04T02:35:36+5:302018-10-04T02:36:08+5:30

सकाळी कडक ऊन आणि दुपारनंतर मुसळधार पाऊस असे वातावरण गेले काही दिवस पुणेकर अनुभवत आहेत.

Hundreds of trees flutter in Pune, rain fall on 'trees' | पुण्यात शेकडो झाडे जमीनदोस्त, परतीचा पाऊस झाडांच्या ‘मुळावर’

पुण्यात शेकडो झाडे जमीनदोस्त, परतीचा पाऊस झाडांच्या ‘मुळावर’

googlenewsNext

पुणे : गेल्या आठवडाभरापासून पुण्यात होत असलेल्या परतीच्या पावसामुळे शहरातील विविध भागांतील शेकडो झाडे जमीनदोस्त झाली आहेत. काल संध्याकाळी झालेल्या पावसात २९ झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. यातील सर्वात जास्त घटना या कोरेगाव पार्क भागातील आहेत.

सकाळी कडक ऊन आणि दुपारनंतर मुसळधार पाऊस असे वातावरण गेले काही दिवस पुणेकर अनुभवत आहेत. सोसाट्याच्या वाऱ्यासोबत येणाºया पावसामुळे रस्त्यांना नदीचे स्वरुप येत आहे. दुपारनंतर अचानक आभाळ भरून येते, विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात होते. यात जोरात वाहणाºया वाºयामुळे झाडे उन्मळून पडण्याच्या घटना वाढत आहेत. रस्त्यावरची मोठमोठाली झाडे या पावसाच्या तडाख्यात सापडत असून अनेक झाडे मुळापासून उखडून पडली आहेत. मंगळवारी झालेल्या पावसात कोरेगाव पार्क येथील बंगल्यांमधील अनेक झाडे जमीनदोस्त झाली. रांगेत असलेल्या बंगल्यांमधील ही झाडे पडल्याने रस्त्यावर काही काळ वाहतूककोंडी झाली होती. त्याचबरोबर अनेक वाहनांचेही नुकसान झाले. झाडपडीमुळे काही भागातला वीजपुरवठा खंडित झाला होता. अग्निशमन दलाच्यावतीने युद्धपातळीवर ही झाडे दूर करण्याचे काम हाती घेण्यात आले होते.
आजही या झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडलेल्या आढळून आल्या. दरम्यान, रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करताना अचानक पडलेल्या फांदीमुळे अग्निशमन दलाचे पाच जवान जखमी झाले आहेत. यातील चार जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे, तर एक जवान गंभीर जखमी आहे.

 

Web Title: Hundreds of trees flutter in Pune, rain fall on 'trees'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.