वेश्याव्यवसायातून मुक्त झालेल्या महिलांसाठी मेळावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2018 07:46 PM2018-01-07T19:46:48+5:302018-01-07T19:46:55+5:30

पुण्यात जिल्हा प्रशासनाच्या वतीने पेन्शन योजनेची माहिती देण्याकरिता वेश्याव्यवसायामधून मुक्त झालेल्या महिलांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये दारिद्र्यरेषेखालील लोकांसह गरजूंसाठीच्या सामाजिक अर्थसहाय्य योजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मोहिमेंतर्गत पुणे शहरातील पात्र लाभार्थी वंचित राहू नये व या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

Groom for prostitute women | वेश्याव्यवसायातून मुक्त झालेल्या महिलांसाठी मेळावा

वेश्याव्यवसायातून मुक्त झालेल्या महिलांसाठी मेळावा

googlenewsNext

पुणे : जिल्हा प्रशासनाच्या वतीने पेन्शन योजनेची माहिती देण्याकरिता वेश्याव्यवसायामधून मुक्त झालेल्या महिलांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये दारिद्रय रेषेखालील लोकांसह गरजूंसाठीच्या सामाजिक अर्थसहाय्य योजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मोहिमेंतर्गत पुणे शहरातील पात्र लाभार्थी वंचित राहू नये व या योजना तळागाळापर्यंत पोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. हे घटक या योजनांपासून अद्यापही वंचित आहेत त्या घटकांमध्ये वेश्या व्यवसायामधून मुक्त झालेल्या स्त्रियांचा समावेश आहे. संजय गांधी निराधार योजना ही या महिलांनाही लागू असून त्यांच्यामध्ये जागरुकता आणण्याची आवश्यकता आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार योजना, वयस्कर महिलांसाठीच्या श्रावणबाळ योजनेची माहिती देण्यात आली.
योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमकी कोणती कागदपत्रे द्यावीत, कोणत्या कार्यालयात ती जमा करावीत यासोबतच या योजना कशा पद्धतीने राबविल्या जातात याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. गरीब, कष्टकरी आणि गरजूंच्या अज्ञानामुळे योजनेपासून वंचित राहू नयेत याकरिता बुधवार पेठेतील सार्वजनिक काका सभागृहामध्ये मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात पुणे शहराचे उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, नायब तहसीलदार विलास भनावसे, माहिती दिली.

Web Title: Groom for prostitute women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.