गिरीष बापट यांच्या नावे फेक फेसबुक अकाउंट उघडणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 13:33 IST2017-07-21T13:33:30+5:302017-07-21T13:33:30+5:30

पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.

Girish Bapat's Fake Facebook account opens | गिरीष बापट यांच्या नावे फेक फेसबुक अकाउंट उघडणारा अटकेत

गिरीष बापट यांच्या नावे फेक फेसबुक अकाउंट उघडणारा अटकेत

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 21- पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने गिरीष बापट यांच्या नावाने बनावट अकाऊंट तयार करून त्यावर महिलांचे अश्लिल फोटो टाकले होते. याप्रकरणी 30 वर्षीय व्यक्तीला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार 22 जून रोजी उघडकीस आला होता. ऋतुराज नलावडे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.तो जुन्नरचा राहणार असल्याची माहिती मिळते आहे. गिरीष बापट यांचे माध्यम सल्लागार सुनील माने यांनी या संदर्भात फिर्याद दाखल केली होती.
 
आरोपी ऋतुराज नलावडे याने गिरीष बापट यांच्या मूळ खात्यावरून काही फोटो घेतले आणि फेसबुकवर त्यांच्या नावाने बनावट अकाऊंट तयार करून त्या खात्यावर महिलांचे अश्लिल फोटो टाकले होते. याची माहिती मिळताच बापट यांचे माध्यम सल्लागार असलेल्या माने यांनी बंडगार्डन पोलिसांमध्ये याप्रकरणी फिर्याद दिली होती.

Web Title: Girish Bapat's Fake Facebook account opens