साडेपाच हजार पुणेकरांची केली ऑनलाईन फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 02:16 AM2019-01-30T02:16:54+5:302019-01-30T02:17:13+5:30

हॅकर्सनी घातला कोट्यवधींना गंडा; पोलिसांनी मिळवून दिले ४ कोटी परत

Fifty-five thousand Pune-based online cheats | साडेपाच हजार पुणेकरांची केली ऑनलाईन फसवणूक

साडेपाच हजार पुणेकरांची केली ऑनलाईन फसवणूक

- विवेक भुसे 

पुणे : बँकेतून बोलत असल्याचे सांगून तसेच तुम्हाला लॉटरी लागली आहे, विम्याचे पैसे मिळवून देतो, अशी असंख्य कारणे सांगून हॅकर्सनी वर्षभरात तब्बल साडेपाच हजार पुणेकरांच्या बँक खात्यातून कोट्यवधीची रक्कम लंपास केली आहे़ पुणे सायबर गुन्हे शाखेने वर्षभरा ४९ आरोपींना अटक करण्यात यश मिळविले आहे.

बँकेतून कोणीही फोन करुन तुमचा पासवर्ड मागत नाही़ कोणालाही बँक खात्याची माहिती देऊ नका, असे बँका तसेच पोलिसांकडून जनजागृती केली जात असते़ तरीही सुरक्षित असलेले पण सायबर साक्षर नसलेले असंख्य लोक हॅकर्सने दाखविलेल्या आमिषाला बळी पडून त्यांना आपल्या खात्याची माहिती देतात व त्यानंतर हॅकर्स त्यांच्या खात्यातील रक्कम काढून घेतात़ भारतीय कंपन्यांशी संबंधित असलेले परदेशी व्यापारी कंपन्यांचे ई मेल हॅक करुन परस्पर दोन कंपन्यांमध्ये होत असलेले आर्थिक व्यवहाराबाबत माहिती घेऊन परदेशी व्यापारी कंपन्यांचे फेक ईमेल आयडी बनवून भारतीय कंपन्यांशी ई मेलद्वारे संपर्क साधून दुसऱ्या बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले जाते़ नोकरीसाठी नामंवत कंपन्यांच्या साईटसारखी फेक साईट बनवून त्याद्वारे नोकरीचे आमिष दाखवून तरुण तरुणींची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जात असल्याचे सर्वाधिक गुन्हे दाखल होत आहे़ पुणे सायबर शाखेकडे आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे वर्षभरात ५ हजार ५०७ अर्ज आले होते़ त्यापैकी ४ हजार २२२ अर्ज पुढील कार्यवाहीसाठी संबंधित पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले होते. त्यापैकी ६८० प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले़ तर ६०५ अर्ज दप्तरी दाखल केले गेले़ या प्रकरणात ४९ आरोपींना सायबर सेलने अटक केली़ या वर्षभरात सर्वात मोठा सायबर हल्ला कॉसमॉस बँकेच्या सर्व्हर करण्यात आला होता. प्रोक्सी सर्व्हर तयार करुन हकर्सनी एकाच वेळी २९ देशातून अडीच हजार क्लोन व्हिसा आणि रुपे कार्डचा वापर करुन तब्बल ९४ कोटी रुपये लंपास करण्यात आले होते़ याप्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी प्रत्यक्ष पैसे काढणाºया ११ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून ६ लाख रुपये जप्त केले आहेत़

३०० जणांना मिळाले ४ कोटी १२ लाख परत
ज्या आॅनलाईन तक्रारीत ओटीपी शेअर केला गेला असेल,तर त्या प्रकरणात बँकेकडून फसवणूक झालेली रक्कम रिफंड केली जात नाही़ अशा प्रकरणात पैसे विविध मर्चंट/ वॉलेटमध्ये पैसे गेले असतात़ सायबर सेलकडून संबंधितांना तातडीन मेलद्वारे पत्रव्यवहार करुन अर्जदारांना रक्कम परत मिळवून दिली जाते़ त्यात प्रामुख्याने नोकरीच्या बहाण्याने, क्रेडीट कार्ड असतानाही फसवणूक झाली़ तसेच कोणतीही बँकेची माहिती शेअर केली नसतानाही त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यात आले, अशा सुमारे ३०० अर्जदारांबाबत सायबर सेलने संबंधित मर्चंट / वॉलेट यांच्याशी संपर्क साधून अर्जदारांना त्यांचे पैसे परत मिळवून दिले़ २०१८ मध्ये सायबर सेलने अशा प्रकारे ४ कोटी १२ लाख ५५ हजार ९०५ रुपये रिफंड मिळवून दिला.

Web Title: Fifty-five thousand Pune-based online cheats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.