चाकाखाली सापडून वडील ठार; मुलगा गंभीर

By Admin | Updated: May 4, 2017 02:16 IST2017-05-04T02:16:39+5:302017-05-04T02:16:39+5:30

बोअरवेल ट्रकच्या चाकाखाली येऊन मोटारसायकलवरील पिता मृत्युमुखी पडला, तर पुत्र गंभीर जखमी झाला. ही घटना नारायणगाव

Father killed by whistle; Son serious | चाकाखाली सापडून वडील ठार; मुलगा गंभीर

चाकाखाली सापडून वडील ठार; मुलगा गंभीर

नारायणगाव : बोअरवेल ट्रकच्या चाकाखाली येऊन मोटारसायकलवरील पिता मृत्युमुखी पडला, तर पुत्र गंभीर जखमी झाला. ही घटना नारायणगाव जवळील धनगरवाडी फाटा येथे घडली.
संतोष दामोदर जाधव (वय ४२, रा. हिवरे बु., ता. जुन्नर) यांचा मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा संकेत (वय १६) हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर पुणे येथे उपचार सुरु आहे .
संतोष जाधव त्यांचा मुलगा संकेत व सुनील गजानन शितोळे हे तिघे मोटारसायकलवरून नारायणगाववरून ओझर रस्त्याने हिवरेकडे जात होते. ट्रक ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या अज्ञात दुचाकीस्वाराने ठोकर दिल्याने संतोष जाधव व त्यांचा मुलगा संकेत हे ट्रकच्या चाकाखाली पडले. चालक शितोळे बाजूला पडल्याने किरकोळ जखमी झाले. संतोष जाधव यांना पुणे येथे हॉस्पिटलमध्ये नेताना मृत्यू  झाला. पुढील तपास सहायक  पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर करत आहेत़(वार्ताहर)

Web Title: Father killed by whistle; Son serious