हडपसर, औंध परिसरात अतिक्रमण कारवाई

By Admin | Updated: May 12, 2014 02:53 IST2014-05-12T02:53:01+5:302014-05-12T02:53:01+5:30

महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाच्या वतीने हडपसर आणि नगर रस्ता परिसरातील अनधिकृत बांधकामांवर नुकतीच कारवाई करण्यात आली.

Encroachment action in Hadapsar, Aundh area | हडपसर, औंध परिसरात अतिक्रमण कारवाई

हडपसर, औंध परिसरात अतिक्रमण कारवाई

पुणे : महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाच्या वतीने हडपसर आणि नगर रस्ता परिसरातील अनधिकृत बांधकामांवर नुकतीच कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे ३0 हजार चौरस फूट अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. या सर्व मिळकतधारकांना नोटीस बजाविण्यात आली होती. हडपसर येथील स. नं. २२१ येथील हॉटेल जय मल्हारच्या पहिल्या मजल्यावर केलेले सुमारे १२00 चौरसफूट बांधकाम काढण्यात आले. याशिवाय स.नं. १५ मधील ९00 चौरसफूट तसेच पक्क्या स्वरूपातील ६00 चौरसफूट क्षेत्र रिकामे करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Encroachment action in Hadapsar, Aundh area