जिमच्या माध्यमातून तरुणाईचा मांडला जातोय नशेचा बाजार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2019 01:05 PM2019-07-08T13:05:57+5:302019-07-08T13:06:55+5:30

पडद्यावरील नायकाची आकर्षक बॉडी, सिक्स अ‍ॅपचे केले जाणारे प्रदर्शन यामुळे आपणही शरीर संपदा कमवावी, हे ध्येय ठेवून असंख्य तरुण आता नियमितपणे जीममध्ये जाऊ लागले आहेत.

doing youth as a drug addicted by gym | जिमच्या माध्यमातून तरुणाईचा मांडला जातोय नशेचा बाजार

जिमच्या माध्यमातून तरुणाईचा मांडला जातोय नशेचा बाजार

googlenewsNext
ठळक मुद्देप्रशिक्षकच पुरविताहेत बेकायदेशीर औषधे : दोन लाखांची औषधे जप्त

पुणे : पडद्यावरील नायकाची आकर्षक बॉडी, सिक्स अ‍ॅपचे केले जाणारे प्रदर्शन यामुळे आपणही शरीर संपदा कमवावी, हे ध्येय ठेवून असंख्य तरुण आता नियमितपणे जीममध्ये जाऊ लागले आहेत़. त्यांना तातडीने रिझल्ट दाखविण्यासाठी काही प्रशिक्षकच मसलची ताकद वाढविण्यासाठी बेकायदेशीरपणे औषधे पुरवित आहेत़. केवळ हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागातच वापरली जाणारी ही औषधे या तरुणांना बेकायदेशीरपणे अव्वाच्या सव्वा दरात विकली जात आहे़. काही दिवस शारीरिक क्षमतेत वाढ झालेली दिसली तरी या औषधांचे साईड इफेक्ट खूप घातक असल्याने हे तरुण नशेच्या विळख्यात अडकण्याची शक्यता वाढली आहे़. 
पुणेपोलिसांनी अशा प्रकारे बेकायदेशीरपणे कोणताही परवाना नसताना या औषधांची विक्री करणाऱ्या तिघांना पकडून अन्न व औषध प्रशासनाकडे दिली असून त्यांच्याविरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़. 
याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक सुहास तानाजी सावंत यांनी स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. पोलिसांनी योगेश किसन मोरे (रा़ दत्तप्रसाद बिल्डिंग, मुंकुदनगर), अशिष गोपाळ पाटील (रा़ पिंपरी), सुरेश चौधरी (रा़ गंगा सॅटेलाईट, वानवडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. त्यांच्याकडून तब्बल १ लाख ८२ हजार १७६ रुपयांची औषधे जप्त करण्यात आली आहेत़. 
याबाबत पोलिसांनी सांगितले की, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते व त्यांच्या पथकाला योगेश मोरे हा विना परवाना औषधांची विक्री करीत असताना आढळून आला़. औषध निरीक्षक सुहास सावंत यांनी त्याच्याकडील औषधांची पाहणी केल्यावर ती औषधे मेफेथेरमाइन सल्फेट इंजेक्शन व इतर औषधे आढळून आली़. ही औषधे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विक्री करता येत नाहीत़. त्याच्याकडे कोणताही औषधे विक्रीचा परवाना आढळून आला नाही़. ही औषधे तो विना बिलाची खरेदी करुन काही जीम तसेच अन्य ग्राहकांना विना बिलाने विकत असल्याचे सांगितले़. या कारवाई दरम्यान त्याच्या दुकानात आशिष पाटील हा आला़ त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडे ही औषधे पुरविण्याचा परवाना आढळून आला नाही़. तसेच सुरेश चौधरी याच्याकडेही औषधे विक्रीचा परवाना नसताना ते जिल्ह्याबाहेरुन तसेच परराज्यातून विना खरेदी बिलासह औषधे घेऊन ती विना बिलाने विक्री करत असल्याचे आढळून आले़. 
ही औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय, औषधाचा मुळ गुणधर्म माहिती नसताना जिममध्ये व इतर ग्राहकांना विक्री केली जाते़. अशा औषधामुळे ग्राहकांच्या स्वास्थास, जिवितास हानी होण्याची शक्यता आहे़. मेफेथेरमाइन सल्फेट इंजेक्शन या औषधाचा उपयोग लो ब्लड प्रेशर मध्ये केला जातो़ या औषधाच्या लेबलवर उत्पादकाचे नाव, पत्ता, परवाना क्रमांक किंवा आयात परवाना क्रमांक नमूद नाही़. त्यामुळे ही औषधे नकली असल्याची शक्यता अन्न निरीक्षक सुहास सावंत यांनी आपल्या फिर्यादीत व्यक्त केली आहे़.

Web Title: doing youth as a drug addicted by gym

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.